5 Years of Tamasha: दीपिका पादुकोनने शेअर केले रणबीर कपूरसोबतचे न पाहिलेले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 13:12 IST2020-11-29T13:12:28+5:302020-11-29T13:12:53+5:30
'तमाशा' सिनेमाला ५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने दीपिकाने आपला को-स्टार रणबीर कपूरसोबतचे या सिनेमातील काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

5 Years of Tamasha: दीपिका पादुकोनने शेअर केले रणबीर कपूरसोबतचे न पाहिलेले खास फोटो
बॉलिवूडमध्ये अनेक फेमस जोड्या आहेत. पण दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूर फॅन्सच्या सर्वात फेव्हरेट ऑन-स्क्रीन कपल्सपैकी एक आहेत. दोघांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या दोघांच्या चांगल्या सिनेमांपैकी एक आहे तमाशा. इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच ५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
'तमाशा' सिनेमाला ५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने दीपिकाने आपला को-स्टार रणबीर कपूरसोबतचे या सिनेमातील काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. दीपिका पादुकोनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सिनेमाच्या शूटींगचे काही फोटो शेअर केले आहेत. यात रणबीर आणि दीपिका इंटेंस सीन शूट करताना दिसत आहे. तर एक व्यक्ती त्यांच्या समोर माइक घेऊन उभा दिसत आहे.
दुसऱ्या फोटो फक्त दीपिका दिसत आहे. ती थकलेली दिसत आहे आणि भिंतीचा आधार घेऊन डोळे बंद करून उभी आहे. तर तिसऱ्या फोटोत दीपिकाने एका सीनचा फोटो शेअर केला आहे ज्यात ती जोकर आणि रणबीर कपूर रोबोटच्या रूपात दिसत आहे. दीपिकाने हे फोटो शेअर करत कॅप्शनला काहीच लिहिले नाही. पण हॅशटॅग्स #5YearsOfTamasha, #5YearsofTara #RanbirKapoor वापरले आहेत. या फोटोत दीपिकाने इम्तियाज अलीला टॅग केलंय.
दीपिका पादुकोन आणि रणबीर कपूर बॉलिवूडच्या सर्वात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. दोघेही ये जवानी है दिवानी, बचना ऐ हसीनो, तमाशा या सिनेमात एकत्र दिसले. दोघे काही वर्षे रिलेशनशिपमध्येही होते. पण हे नातं टिकू शकलं नाही.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती दिग्दर्शक शकुन बत्राच्या सिनेमाचं शूटींग करत आहे. तसेच तिचा ८३ हा सिनेमाही येणार आहे. त्यासोबतच ती प्रभाससोबतही एका बिग बजेट सिनेमात दिसणार आहे. यात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका असणार आहे.