अक्षय घेणार 42 कोटी फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 17:01 IST2016-06-04T11:31:00+5:302016-06-04T17:01:00+5:30
होय, खिलाडीयों का खिलाडी अक्षय कुमार एका दिवसाच्या शूटींगसाठी १ कोटी रुपए फी घेणार आहे. आता कुठल्या चित्रपटासाठी तर..‘जॉली ...

अक्षय घेणार 42 कोटी फी!
ह य, खिलाडीयों का खिलाडी अक्षय कुमार एका दिवसाच्या शूटींगसाठी १ कोटी रुपए फी घेणार आहे. आता कुठल्या चित्रपटासाठी तर..‘जॉली एलएलबी२’साठी. होय, ‘जॉली एलएलबी’चा नवा सिक्वल लवकरच येतोय. येत्या जुलैमध्ये त्याचे शूटींगही सुरु होत आहे. ‘जॉली एलएलबी’मध्ये अशरद वारसी याने मुख्य भूमिका साकारली होती. पण याच्या सिक्वलमध्ये मात्र अक्षय दिसणार आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित याच चित्रपटासाठी अक्षय एका दिवसाला १ कोटी रुपए फी घेणार आहे. ४२ दिवस चित्रपटाचे शूटींग चालणार आहे. म्हणजे अक्षयला या चित्रपटासाठी तब्बल ४२ कोटी रुपए मिळतील. चित्रपटाचे एकूण बजेट ६२ कोटी आहे. यातील ४२ कोटी एकट्या अक्षयला जाणार आहेत. हा चित्रपट म्हणजे कोर्ट रूम ड्रामा आहे.चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप ठरलेली नाहीयं. तूर्तात तरी अक्षयचीच लॉटरी लागलीय...