आर माधवनने दिवाळीनिमित्त खरेदी केली ४० लाखाची मोटरसायकल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:01 IST2017-10-24T06:00:34+5:302017-10-24T14:01:30+5:30

आर माधवनला अभिनयानंतर कशाचे वेड असेल तर ते मोटारसायकलचे. या दिवाळीच्या निमित्ताने त्याने त्याच्या गॅरेजमध्ये मध्ये आणखी एका मोटरसायकलचा ...

40 mph motorcycle bought by R Madhavan for Diwali ... | आर माधवनने दिवाळीनिमित्त खरेदी केली ४० लाखाची मोटरसायकल...

आर माधवनने दिवाळीनिमित्त खरेदी केली ४० लाखाची मोटरसायकल...

माधवनला अभिनयानंतर कशाचे वेड असेल तर ते मोटारसायकलचे. या दिवाळीच्या निमित्ताने त्याने त्याच्या गॅरेजमध्ये मध्ये आणखी एका मोटरसायकलचा समावेश केला आहे. अभिनेता आर. माधवन ने या दिवाळीत स्वतःसाठीच गिफ्ट खरेदी केले आहे. त्याने या दिवाळीत स्वतःसाठी एक बाईक घेतली आहे त्याची किंमत जवळजवळपास रुपये ४० लाख सांगण्यात येते आहे.

आर. माधवन बाईक्सचा अतिशय वेड आहे. त्याने या दिवाळीत एक क्रुजर बाईक खरेदी केली आहे.  आर. माधवनने  सोशल मीडियावर त्याच्या बाईकचा फोटो शेअर केले आहे. इंडियन रोडमास्टर हे अमेरिकन कंपनी आहे. माधवनने १९ ऑक्टोबरला आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या पोस्ट मध्ये लिहिले "माझी दिवाळी यावेळेस दणक्यात साजरी होणार आहे हुरे! मी फार उत्साहित आहे  माझा "बिगबॉय"माझ्या बरोबर आहे.. तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाली. 



इंडियन रोड मास्टरचे नाव क्रुजर बाईक कंपनीमध्ये फार प्रसिद्ध आहे. माधवनची बाईक ड्युल कलर मध्ये आहे. .सर्वात खास म्हणजे या बाईकमध्ये टच स्क्रीन म्युझिक सिस्टिम, एलएडी लाईट, ब्लुटूथ आणि क्रुज कंट्रोल आहे जी या बाईकची शान वाढवतात.

माधवन सुशांत सिंग राजपूतसोबत 'चंदा मामा दूर के'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. यात माधवन एअर फोर्स पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरन सिंह चौहान करतो आहे. या चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूत नासाला जाऊन ट्रेनिंग घेऊन आला आहे. तसेच तो 'विक्रम वेधा'‘विक्रम वेधा’ या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. येत्या काळात एक दमदार अ‍ॅक्शन फिल्म आपल्याला पाहायला मिळणार आहे.  गायत्री-पुष्कर दिग्दर्शित या क्राईम थ्रीलर  सिनेमात आर माधवन व विजय सेतुपती यांच्याशिवाय वरलक्ष्मी सरथमकुमार, श्रद्धा श्रीनाथ आणि जॉन विजय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. रहेना हैं तेरे दिल में या सिनेमातून त्याने बॉलीवुडमध्ये एंट्री केली. पहिल्याच सिनेमातील आपल्या अभिनयाने माधवनने रसिकांची मने जिंकली

Web Title: 40 mph motorcycle bought by R Madhavan for Diwali ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.