3841_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 07:50 IST2016-03-03T14:50:28+5:302016-03-03T07:50:28+5:30

गेल्या कित्येक वर्षांपासून लग्नाच्या अफवांचा सामना करणाºया प्रिती जिंटाने अखेर गुपचुप लग्न करून अफवांना पुर्णविराम दिला. तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लॉस एंजिलिस येथे ती विवाहबंधनात अडकली. प्रिती व्यतिरिक्त रानी मुखर्जी, आफताब शिवदासानी, कुणाल कपूर, जूही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी गुपचुप लग्न लावून संसार थाटला आहे. अशाच काही सीक्रेट मॅरेज केलेल्या सेलेब्सचा घेतलेला आढावा...

3841_article | 3841_article

3841_article

ल्या कित्येक वर्षांपासून लग्नाच्या अफवांचा सामना करणाºया प्रिती जिंटाने अखेर गुपचुप लग्न करून अफवांना पुर्णविराम दिला. तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लॉस एंजिलिस येथे ती विवाहबंधनात अडकली. प्रिती व्यतिरिक्त रानी मुखर्जी, आफताब शिवदासानी, कुणाल कपूर, जूही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी गुपचुप लग्न लावून संसार थाटला आहे. अशाच काही सीक्रेट मॅरेज केलेल्या सेलेब्सचा घेतलेला आढावा...
रानी मुखर्जी - आदित्य चोपडारानी मुखर्जी हिने २१ एप्रिल २०१४ रोजी निर्माता आदित्य चोपडा याच्याशी इटली येथे गुपचुप लग्न केले. आदित्यचे हे दुसरे लग्न आहे. दोघांच्या लग्नाची बातमी यशराज बॅनरच्या माध्यमातून दिली गेली. मीडियाला दूर ठेवलेल्या या लग्नाचा एकही फोटो समोर आलेला नाही.

कुणाल कपूर - नैना बच्चनकुणाल कपुरने अमिताभ बच्चनची पुतनी नैना बच्चन हिच्याशी फेब्रुवारी २०१५ मध्ये सेशेल्स आइलॅँड येथे गुपचुप विवाह केला. या लग्नात केवळ परिवारातील लोक उपस्थित होते.

आफताब - निन दुसांजजून २०१४ मध्ये आफताब शिवदासानी याने गर्लफ्रेंड निन दुसांज हिच्याशी गुपचुप विवाह केला. आतापर्यंत त्यांच्या लग्नचा एकही फोटो प्रसिद्ध झालेला नाही.

जॉन अब्राहम - प्रिया रूंचालबिपाशा बासु हिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर जॉन अब्राहम याने जानेवारी २०१४ मध्ये प्रिया रूंचाल हिच्याशी लग्न केल्याचा खुलासा करून संगळ्यानाच धक्का दिला. जॉनने प्रियासोबत यूएसमध्ये लग्न केले. स्वत:च जॉननेच त्याच्या ट्विटर हॅँडलवरून लग्नाची माहिती दिली.

सेलेना जेटली - पीटर हेगसन २०११ मध्ये सेलेना जेटलीने पीटर हेग याच्याशी लग्न केले. तब्बल एक महिन्यानंतर ट्विटरवरून सेलेनाने बॉयफ्रेंड पीटरशी विवाहबंधनात अडकल्याची बातमी दिली. या खुलासा तेव्हा केला जेव्हा ती प्रेग्नेंट होती.

किम शर्मा - टायकून अली पुंजानीकिम शर्माने २०१० मध्ये बिझनेसमॅन टायकून अली पुंजानी याच्याशी लग्न केले. किमचे हे पहिले तर अलीचे दुसरे लग्न होते.

अंतरा माळी - कुरियनअंतरा माळीने जीक्यू मॅगजीनचे एडिटर कुरियन याच्याबरोबर गुपचुप लग्न केले. दोघे एकमेकांना डेट करीत होते, हे कोणालाच माहित नव्हते.

संजय दत्त - मान्यतादोन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर संजय दत्तने मान्यताबरोबर लग्न केले. या लग्नाची सेरेमनी गोवा येथे ११ फेब्रुवारी २००८ ला झाली. मान्यताचे हे दुसरे तर संजयचे तीसरे लग्न होय.

मनोज वाजपेयी - नेहामनोज वाजपेयीने अभिनेत्री नेहा (शबाना रजा) हिच्याशी २००६ मध्ये गुपचुप लग्न केले. दोघांनी लग्नाचा निर्णय ऐवढ्या तडकाफडकी घेतला की, त्यांच्या लग्नात कुटूंबातील बरेचसे सदस्य सहभागी होवू शकले नाही.

श्रीदेवी - बोनी कपूरश्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यातील अफेयर्सचे किस्से गाजत असताना श्रीदेवीने एकाएकी १९९६ मध्ये तिच्यापेक्षा वयाने ८ वर्ष मोठे असलेल्या दिग्दर्शक बोनी कपूर याच्याशी गुपचुप लग्न लावून संगळ्यानाच धक्का दिला. असे म्हटले जाते की, श्रीदेवीचा या लग्नाला नकार होता. मात्र ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला लग्न करणे भाग पडले.

धर्मेंद्र - हेमा मालिनीधर्मेंद्र आणि हेमा मालिनीने खंडाळा येथे पळून जावून लग्न केले. १९८० मध्ये धर्मेद्रने धर्म बदलून हेमाशी संसार थाटला.

Web Title: 3841_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.