३ लग्न, ३ घटस्फोट, तरीदेखील बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायकाला मिळालं नाही खरं प्रेम, म्हणाला - "सर्व नाती आजही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:29 IST2025-11-12T15:28:22+5:302025-11-12T15:29:16+5:30
बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायकाने एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले आणि त्यांचे एकही लग्न यशस्वी झाले नाही, हे स्पष्टपणे कबूल केले.

३ लग्न, ३ घटस्फोट, तरीदेखील बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायकाला मिळालं नाही खरं प्रेम, म्हणाला - "सर्व नाती आजही..."
आपण सर्वजण लकी अली यांना त्यांच्या सदाबहार गाणे 'ओ सनम'साठी ओळखतो, पण त्यांची तीन लग्ने झाली आणि त्यांचे ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्याशी जवळचे कौटुंबिक नाते आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांची आई, मधु कुमारी, ज्यांना महलिका म्हणूनही ओळखले जात होते, त्या मीना कुमारी यांच्या बहीण होत्या आणि दोघींमध्ये एक अतूट नाते होते. मीना कुमारी लकी अलीवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करत असत. सध्या बंगळूरमध्ये शांत आणि समाधानी आयुष्य जगणाऱ्या लकी अली यांनी नुकतेच त्यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या लग्नांविषयी, त्यांच्या करिअरविषयी आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या कारणांविषयी मोकळेपणाने संवाद साधला.
लकी अली नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही मोकळेपणाने सांगितले आणि त्यांचे एकही लग्न यशस्वी झाले नाही, हे स्पष्टपणे कबूल केले. लकी अली यांनी पहिले लग्न मेघन जेन मॅक्लेरी यांच्याशी केले, त्यांना दोन मुले झाली. त्यांचे दुसरे लग्न इराणी महिला इनाया यांच्याशी झाले आणि त्यांनाही दोन मुले झाली. २०१० मध्ये, त्यांनी ब्रिटिश मॉडेल आणि माजी ब्युटी क्वीन केट एलिझाबेथ हॉलम यांच्याशी लग्न केले, त्यांना एक मुलगा आहे, परंतु २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
''एकमेकांसाठी नेहमी असतो उपलब्ध''
लकी अली यांनी सांगितले, ''तुम्ही आयुष्याची सुरुवात आणि शेवट एकाच जोडीदारासोबत करावी असे आवश्यक नाही. मी तीन वेळा लग्न केले, प्रत्येक वेळी वेगळ्या देशात आणि प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी होती. माझ्या वडिलांनीही भारताबाहेर लग्न केले होते, त्यामुळे आमच्या घराचे वातावरण खूपच जागतिक होते. माझे एकही लग्न यशस्वी झाले नाही, पण माझे सगळे संबंध आजही जिवंत आहेत. आम्ही एकत्र राहत नाही, पण आम्ही नेहमी एकमेकांसाठी उपलब्ध असतो. मी नेहमीच माझ्या मुलांप्रती जबाबदार राहिलो आहे. माझा विश्वास आहे की संगोपनाचा एकमेव खरा मार्ग प्रेम आहे, मुले त्यांच्या आई-वडिलांना जे करताना पाहतात, त्यातून शिकतात.'' लकी अली यांचे वडील, अनुभवी अभिनेते मेहमूद यांनी त्यांची पहिली पत्नी मधु कुमारीपासून वेगळे झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या ट्रेसी यांच्याशी लग्न केले होते.
लकी अलींनी बॉलिवूडला का केलं रामराम?
लकी अली यांनी मुलाखतीत सांगितले, ''एक काळ होता जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करत होतो आणि गाणी गात होतो, पण नंतर मला कळले नाही की आणखी काय करावे. मला माझ्या शैलीत गाणे गायचे होते, 'ओ सनम'चा जन्म याच स्वातंत्र्याच्या शोधातून झाला होता. २०१५ मध्ये, मी स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केले. लोकांनी माझ्यासोबत वाईट वागणूक दिली होती. माझ्या वडिलांच्या निधनानंतर, मला वाटले की माझ्यासाठी तिथे काहीच उरलेले नाही. माझे कोणी मित्रही नव्हते.'' लकी अली हे प्रसिद्ध अभिनेता-विनोदी कलाकार मेहमूद यांचे पुत्र आहेत, जे स्वतः एक सुपरस्टार होते.
बॉलिवूडपासून दूर गेल्यावरही, लकी अली त्या अनुभवांसाठी आणि ज्या लोकांनी त्यांना संधी दिली, त्यांच्याबद्दल आभारी आहेत. ते म्हणाले, ''मी श्याम बेनेगल यांच्यासोबत 'त्रिकाल' आणि 'भारत एक खोज'मध्ये काम केले आणि नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि ओम पुरी यांसारख्या कलाकारांकडून खूप काही शिकलो. काही वर्षांनंतर, मी माझा आवाज शोधण्यासाठी संगीताकडे परतलो. मला जाणवले की जर माझे टॅलेंट खरे असेल, तर लोक माझे ऐकतील आणि नसेल, तर ते मला नाकारतील.''