​ २२ कलाकार अन् चार महिन्यांचे संशोधन! तेव्हा कुठे फायनल झाला ‘पद्मावती’तील शाहिद कपूरचा ‘लूक’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 12:32 IST2017-09-26T07:02:24+5:302017-09-26T12:32:24+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर देन लाईफ’ सिनेमांसाठी ओळखले जातात. ‘जोधा अकबर’,‘बाजीराव मस्तानी’ यासारख्या पीरियड ड्रामानंतर येत्या दिवसांत ...

22 Artists and 4 Months Research! Then where did the final sound of 'Shahid Kapoor's' Look in Padmavati !! | ​ २२ कलाकार अन् चार महिन्यांचे संशोधन! तेव्हा कुठे फायनल झाला ‘पद्मावती’तील शाहिद कपूरचा ‘लूक’!!

​ २२ कलाकार अन् चार महिन्यांचे संशोधन! तेव्हा कुठे फायनल झाला ‘पद्मावती’तील शाहिद कपूरचा ‘लूक’!!

ग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर देन लाईफ’ सिनेमांसाठी ओळखले जातात. ‘जोधा अकबर’,‘बाजीराव मस्तानी’ यासारख्या पीरियड ड्रामानंतर येत्या दिवसांत त्यांचा असाच एक  ‘लार्जर देन लाईफ’  पीरियड ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे. हा सिनेमा म्हणजे, ‘पद्मावती’. 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘पद्मावती’चे अर्थात हे कॅरेक्टर साकारणार असणा-या दीपिका पादुकोणचे फर्स्ट लूक तुम्ही पाहिले आणि पाठोपाठ काल या चित्रपटातील राजा रतन सिंह याचे लूक जारी करण्यात आले. अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटात राजा रतन सिंहची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. सध्या या लूकची जोरदार प्रशंसा सुरु आहे. पण या प्रशंसेमागे ४ महिन्यांचे संशोधन आणि २२ कलाकारांची मेहनत आहे. होय, चित्रपटातील तिन्ही प्रमुख पात्र म्हणजे, पद्मावती, राजा रतन सिंह आणि अलाऊद्दीन खिल्जी या तिघांचीही वेशभूषा ठरवण्याआधी बराच अभ्यास केला गेला.



शाहिदच्याच लूकची गोष्ट करायची झाल्यास, २२ कलाकारांनी यासाठी जीवतोड मेहनत केली. विशेषत: शाहिदच्या कपड्यांसाठी प्रचंड संशोधन केले गेले. शाहिदचे लूक ठरविण्यात मोलाची भूमिका बजावणारे डिझाईनर रिम्पेल आणि हरप्रीत नरूला यांनी सांगितले की, चित्रपटातील पात्र आणि त्यांचा वेशभूषा खरी वाटावी, त्यातील प्रामाणिकता कायम राहावी यासाठी आम्ही १४ व्या शतकातील चित्तोडच्या राजघराण्याच्या वेशभूषेचा अभ्यास केला. शाहिदचे कपडे तयार करण्यासाठी राजस्थानातील २२ कलाकारांनी हातांनी जरी काम केले. या कपड्यांवर वेजिटेबल डाय किंवा हाताने करण्यात येणाºया डायचा वापर करण्यात आला आहे. आम्ही रंगांकडे विशेष लक्ष दिले. कारण राजस्थानी कपड्यांमध्ये रंग सर्वाधिक महत्त्वाचे असतात. सर्व पात्रांचे कपडे डिझाईन करण्यासाठी राजस्थानी संग्रहालयात चार महिने आमचा अभ्यास चालला. तेव्हा कुठे हा लूक फायनल झाला. 

ALSO READ : Padmavati New Posters : सावधान...महारावल रतन सिंह पधार चुके है!

एकंदर सांगायचे तर दीपिका व शाहिदच्या लूकची प्रशंसा होत असेल तर त्याचे श्रेय  डिझाईनरच्या या टीमला द्यायला हवी. त्यापूर्वी या डिझाईनर टीमने केलेले काम तुम्हाला किती आवडले, ते आम्हाला जरूर कळवा. 

Web Title: 22 Artists and 4 Months Research! Then where did the final sound of 'Shahid Kapoor's' Look in Padmavati !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.