यश चोप्रा यांच्याबद्दलमाहिती नसलेल्या 20 गोष्टीं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 18:09 IST2016-09-27T12:39:07+5:302016-09-27T18:09:07+5:30

बाॅलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांचा आज वाढदिवस. बाॅलिवूडच्या या किंग आॅफ रोमान्सच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांना माहिती ...

20 things that are not known about Yash Chopra | यश चोप्रा यांच्याबद्दलमाहिती नसलेल्या 20 गोष्टीं.

यश चोप्रा यांच्याबद्दलमाहिती नसलेल्या 20 गोष्टीं.

dir="ltr">बाॅलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांचा आज वाढदिवस. बाॅलिवूडच्या या किंग आॅफ रोमान्सच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांना माहिती नसलेल्या 20 गोष्टीं.
 
1.दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांच्या करिअरची सुरुवात  इंद्रजीत सिंघ जोहर यांच्याकडे केली. नंतर त्यांचा भाऊ  बी. आर. चोप्रा यांच्याकडे असिस्टंट म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. बी. आर. चोप्रा हे फिल्म इंडस्ट्रीतील फार मोठे नाव असल्याने यश चोप्रा यांना फार मोठा संघर्ष करावा लागला नाही. बी. आर. चोप्रा यांनी ‘धुल का फुल’ या चित्रपटाची निर्मिती  यश चोप्रा यांच्यासाठीच केली आणि हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. 
 
 
2. १९७३मध्ये यश चोप्रांनी बी. आर. चोप्रा यांच्यामध्ये  मतभेद झाल्यानंतर ‘यशराज फिल्म’नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. सुरुवातीच्या काळात त्यांना राजेश खन्ना यांनी साथ दिली. अनेकांना माहीत नसेल की, यशराजमधील ‘राज’ हा राजेश खन्ना यांच्या नावातला ‘राज’ आहे.
 
 
3. 'दाग' या चित्रपटासाठी राजेश खन्ना-राखी आणि शर्मिला टागोर यांनी आपल्या कामाचा एकही पैसा मोबदला म्हणून घेतला नव्हता. 
 
4. या चित्रपटांची परतफेड म्हणून यश चोप्राने ‘त्रिशूल’, ‘कभी कभी’ आणि ‘काला पत्थर’मध्ये राखीला चांगल्या भूमिका दिल्या. मात्र, राजेश खन्नाबरोबर त्यांचे संबंध चढ-उताराचे राहिले.
 
5. यानंतर रोमँटिक चित्रपटांचा काळ संपला होता हे यश चोप्रांनी अचूक ओळखून सलीम-जावेदची ‘दिवार’ची स्क्रिप्ट आपल्या पुढच्या चित्रपटासाठी निश्चित केली. दिवारच्या यशानंतर चित्रपटसृष्टीत सलीम-जावेद नावाचे एक वादळ आले.
 
6. ‘कभी कभी’ या चित्रपटात यश चोप्रा आपल्या सर्व वैशिष्टयांसह दिसले.

या चित्रपटाची कथा यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्राने लिहिली होती.

7. 'कभी कभी' या चित्रपटात अॅक्शन हिरो अमिताभ बच्चन  यांची निव़ड करण्य़ात आली.  एका अॅक्शन हिरोला रोमाँटिक रोल देणे ही रिस्कच यश चोप्रा यांनी घेतली होती. 

8.  ‘सिलसिला’ या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य यातील गाणं चोप्रा यांची पत्नी  पामेला चोप्राने गायले होते. 

9. ‘सिलसिला’ सिनेमामुळे बसलेला सेटबॅक यश चोप्राला गोंधळात टाकून गेला आणि उत्तरोत्तर ‘मशाल’, ‘फासले’, ‘विजय’ या १९८०च्या दशकातील चित्रपटांमध्ये हा गोंधळ वाढतच गेला. या गोंधळामधून ते स्वतःला ही सवारू शकले नाहीत. पण या चित्रपटानंतर त्यांचा ‘चांदनी’या चित्रपटाने कमालच केली.

10.यश चोप्रा यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात रिस्की चित्रपट बनवला, तो म्हणजे ‘लम्हे’. ज्या पुरुषाला आईने नाकारले, त्या पुरुषाच्या प्रेमात त्या आईची मुलगी पडते, त्यांच्या या रिस्कची बाॅलिवूडमध्ये खूप चर्चा रंगली होती. 

11. १९८० ते १९९०च्या दरम्यान यश चोप्रांना जे अपयश मिळाले होते त्यातून सो कॉल्ड कमर्शियल फॉम्युर्ले आपल्यासाठी योग्य ठरत नाहीत, हा धडा यश चोप्रा शिकले होते.

12. ‘लम्हे’ सिनेमा फ्लॉप होऊनही त्यांनी पुन्हा एकदा रिस्क असलेली कथा निवडली आणि ‘डर’ बनवला. आमीर खानने सोडलेला रोल शाहरुख खानने स्वीकारला आणि इथून पुढे यश चोप्रा-शाहरुख खान हे नवे समीकरण तयार झाले.

13.. संपूर्ण इंडस्ट्रित आनंद बक्षीचे चाहते असताना ही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही. 

14. कायमच आपल्या चित्रपटांतून स्वित्झर्लंडमधील अत्यंत सुंदर ठिकाणाचे चित्रीकरण रुपेरी पडद्यावर अत्यंत दिमाखदार पद्धतीने यश चोप्रा यांनी आपल्या चित्रपटातून केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत स्वित्झर्लंड सरकारने त्यांचा एक पुतळा उभारला आहे. 

15. 1981मध्ये यश चोप्रा यांचा 'सिलसिला' या चित्रपटासाठी सर्वात आधी स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांची निवड करण्यात आली होती. 

16. यश चोप्रा यांच्या चित्रपटात संगीताला नेहमीच महत्त्व देण्यात आला. ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात तर अभिनयाबरोबर गाण्यांनाही तितकचं महत्त्व देण्यात आले.

17. 'दिल तो पागल' या चित्रपटासाठी माधुरी दीक्षितसाठी मनीष मल्होत्रा यांनी तयार केलेले 54 सलवार कमीज यश चोप्रा यांनी नाकारले.

18. 'वीरझारा' या चित्रपटाला 'ये कहा आ गए हम' असे देण्यात येणार होतो. मात्र ऐनवेळेला 'वीरझारा' हे नाव देण्य़ाचा निर्णय झाला.  

19. 'डर' या चित्रपटाचे शुटिंग स्वित्झर्लंडमध्ये सुरू होते त्यावेळी शाहरूख खानला फुल कोट हा ड्रेस दिला होता तर जुही चावला हिला शाॅट ड्रेस दिला होता. मात्र ऐवढ्या थंडी असल्याने तिेन हा ड्रेस घालण्यास नकार दिला. त्यानतंर तिला हंटर शूज देण्यात आले. 

 

20. 'बाजार' या चित्रपटासाठी सरहदीसारख्या लेखकालाही यश चोप्रा यांनी मदत केली. 

Web Title: 20 things that are not known about Yash Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.