​15 Years of K3G: ‘कभी खुशी, कभी गम’ का आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 14:09 IST2016-12-14T14:07:51+5:302016-12-14T14:09:45+5:30

सन २००१ मध्ये आजच्याच दिवशी (१४ डिसेंबर) ‘कभी खुशी, कभी गम’ हा सिनेमा देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या ...

15 Years of K3G: Why is 'Gudi' ever happy, sometimes? | ​15 Years of K3G: ‘कभी खुशी, कभी गम’ का आहे खास?

​15 Years of K3G: ‘कभी खुशी, कभी गम’ का आहे खास?

ong>सन २००१ मध्ये आजच्याच दिवशी (१४ डिसेंबर) ‘कभी खुशी, कभी गम’ हा सिनेमा देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आज १५ वर्षे पूर्ण झालीत. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन, जया बच्चन,किंगखान शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करिना कपूर तसेच अतिथी भूमिकेत दिसलेली राणी मुखर्जी अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा फॅमिली ड्रामा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत उतरला होता. ‘कुछ कुछ होता है’ नंतर करण जोहरने दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट होता. 
आज १५ वर्षे झालीत तरीही ‘कभी खुशी, कभी गम’ हा चित्रपट तितकेच मनोरंजन करतो. काही चित्रपट कधीही विस्मरणात जात नाही. ‘कभी खुशी, कभी गम’ हे त्याचेच उदाहरण...




या चित्रपटात काजोलने साकारलेली क्यूट आणि काहीशी विनोदी भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात असेल. काजोलच्या तोंडी असलेला ‘वड्डे लोक, वड्डी बातें’  हा डायलॉग आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी वापरला असेल.



तुम्ही दारावरची बेल वाजवली आणि बेल वाजवण्यापूर्वीच तुमच्या आईने तुम्ही आलेले कळून दरवाजा उघडला, असे कधी तुमच्याबाबतीत झालेय? काहीजण या प्रश्नाचे उत्तर हो असे देतील तर काही जण नाही. कारण सर्व आया जया बच्चन नसतात ना?



‘कभी खुशी कभी गम’मधील हृतिकने साकारलेला रोहन रायचंद तर आठवत असेल. किमान हृतिकच्या लेडी फॅन्स त्याला कसे विसरू शकतील?



करिनाने रंगवलेले ‘पू’ हे कॅरेक्टर म्हणजे या चित्रपटाची ‘जान’ होते. सतत बडबडणारी, हॉट मुलांवर लट्टू होणारी पू...अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर अशी पू प्रत्येकाच्या मनात दडलेली असते.



एसआरकेबद्दल काय बोलणार नसू, असे शक्यच नाही. एक श्रीमंत, हँडसम तरूण एका मध्यमवर्गीय मुलीच्या प्रेमात पडतो आणि मग पडद्यावर रोमान्स रंगतो. शाहरूखला रोमान्सचा बादशहा म्हणतात, ते उगीच नाही.





 

Web Title: 15 Years of K3G: Why is 'Gudi' ever happy, sometimes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.