/>पोर्न स्टार अशी पूर्वाश्रमीची ओळख पुसून बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री सनी लिओनी आता धुम्रपानाविरोधात जनजागृती करताना दिसत आहे. ‘संस्कारी बाबू’ आलोकनाथ यांच्यासोबतचा सनीचा ‘11 minutes ‘ या नावाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजत आहे. नेटीझन्सनी हा व्हिडिओ डोक्यावर घेतला आहे. सनी, आलोकनाथ यांच्यासोबतच अभिनेता दीपक डोब्रियालही यात आहे. मात्र सनी या दोघांवरही भारी पडली असून आपल्या हटके स्टाईलने तिने यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. सिगारेटचे व्यसन असलेला मुलगा(दीपक डोब्रियाल) शेवटच्या घटका मोजत आहे. त्याचे पिता अर्थात आलोकनाथ आपल्या मरणासन्न अवस्थेतील आपल्या या मुलाला त्याची अखेरची इच्छा विचारतात. मला सनी लिओनीसोबत लग्न करायचे असल्याचे तो मुलगा सांगतो. त्यानुसार आलोकनाथ सनीसोबत मुलाचे लग्न लावून देतात. सनी आलोकनाथ यांची सून बनून घरी येते. यानंतर काय घडते, हे पाहायचे तर तुम्हाला हा व्हिडिओच बघावा लागणार.