‘फोर्स 2’ च्या ट्रेलरला मिळाले 1 कोटी व्ह्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:02 IST2016-10-09T12:40:05+5:302016-10-17T15:02:37+5:30
जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘फोर्स 2’ ट्रेलर 29 सप्टेंबरला रिलीज करण्यात आले होते. के वळ 10 दिवसांत या ट्रेलरला 1 कोटी व्ह्यूस मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स’चा सिक्वल असून यात जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘फोर्स 2’ च्या ट्रेलरला मिळाले 1 कोटी व्ह्यू
3 मिनिट 5 सेकंदाचे ‘फोर्स 2’ चे ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित करण्यात आले होते. आतापर्यंत याला 1 कोटी 5 लाख लोकांनी पाहिले असल्याची माहिती निर्माता विपूल अमृतलाल शाह यांनी दिली. देशासाठी प्राण देणाºया शहिदांना हा चित्रपट समर्पित करण्यात आला असून यात अशाच एका पोलीस अधिकाºयाची कथा दाखविण्यात आली आहे. देशासाठी प्राण देणारा हा अधिकारी आज काळाच्या पडद्याआड गेला असल्याचे विपूल शहा यांनी सांगितले. मागील एक वर्षांपासून आम्ही या चित्रपटावर काम करीत आहोत. ‘फोर्स 2’ च्या ट्रेलरला मिळालेले यश हे आमच्या मेहनत व इमानदारीला प्रेरणा देणारे ठरले आहे. असेही शहा म्हणाले.
फोर्सच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, जेनिलिया डिसूजा व विद्युत जम्मावल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘फोर्स 2’चे दिग्दर्शन अजिंक्य देव करीत आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
">http://