'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 11:42 IST2025-05-24T11:39:38+5:302025-05-24T11:42:10+5:30

Mukul Dev Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

bollywood son of sardaar fame actor mukul dev passed away at the age of 54 year | 'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Mukul Dev Death: बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देवचं (Mukul Dev)  निधन झालं आहे. दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान, वयाच्या ५४ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री मुकुल देवचे निधन झाल्याची झाल्याची माहिती मिळते आहे. मुकुल देवच्या निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

दरम्यान, अभिनेत्री दीपशिखा नागपालने सोशल मीडियावर या बातमीला दुजोरा दिला आहे. तिने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करुन अभिनेत्याच्या निधनाची माहिती दिली आहे.  अभिनेता मुकुल देव गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निधनाची बातमी कळताच चाहते शोक व्यक्त करत आहेत.

मुकुल देवच्या निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. दरम्यान, मुकुल देवने १९९० च्या दशकात ‘मुमकिन’ या दूरचित्रवाणीवरील  मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबर अनेक मालिका, वेब सीरीजमध्ये तो झळकला. त्याने पडद्यावर साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या.'दस्तक', 'यमला पगला दिवाना', 'आर... राजकुमार', 'जय हो' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. मुकुल देवचा जन्म नवी दिल्ली येथे जालंधरजवळील एका गावात मूळ असलेल्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील हरी देव, सहाय्यक पोलिस आयुक्त होते. 

Web Title: bollywood son of sardaar fame actor mukul dev passed away at the age of 54 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.