संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'मध्ये 'या' अभिनेत्रीला साकारायची होती काशीबाई! पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 15:25 IST2025-08-17T15:21:57+5:302025-08-17T15:25:52+5:30

'बाजीराव मस्तानी'मध्ये 'या'अभिनेत्रीला साकारायची होती काशीबाईंची भूमिका, नेमकं कुठं बिनसलं?

bollywood actress isha koppikar reveals about she want to play kashibai role in bajirao mastani movie says | संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'मध्ये 'या' अभिनेत्रीला साकारायची होती काशीबाई! पण...

संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'मध्ये 'या' अभिनेत्रीला साकारायची होती काशीबाई! पण...

Bajirao Mastani: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट आजवरच्या आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि प्रियंका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. 18 डिसेंबर 2015 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु, तुम्हाला माहितीये का संजय लीला भन्साळी यांना ९० च्या दशाकात बाजीराव-मस्तानी बनवायचा होता. परंतु दुर्दैवाने दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. 

दरम्यान,या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने पेशवे बाजीराव यांची भूमिका साकारली होती. तर प्रियांका बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांच्या भूमिकेत दिसली. परंतु, तुम्हाला माहितीये का सुरुवातीला जेव्हा बाजीराव मस्तानी बनवण्यात येत होता तेव्हा अभिनेत्री ईशा कोप्पिकरला काशीबाई ही भूमिका साकारायची होती. 'झुम'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, @मी संजय सरांना बाजीरव मस्तानीच्या कास्टिंगदरम्यान भेटले होते. काही वर्षांपूर्वी ते पूर्णपणे वेगळ्या कलाकारांसोबत हा चित्रपट बनवत होते. कास्टिंग पूर्ण होऊनही तेव्हा तो चित्रपट बनवला गेला नाही. ही गोष्ट जवळपास १५ वर्षांपूर्वीची आहे. मात्र, अखेर त्यांनी हा सिनेमा बनवला. तेव्हा मी इंडस्ट्रीत अगदीच नवीन होते. "

संजय लीला भन्साळींनी ईशा कोप्पिकरला हा प्रोजेक्ट  केला नव्हता. तर, चित्रपटात काशीबाई ही भूमिका आपण साकारावी असं तिला वाटतं होतं. त्यासाठी अभिनेत्री त्यांना भेटायला गेली होती, असंही तिने मुलाखतीत सांगितलं. 

अखेर 2015मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता.सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना बाजीराव आणि मस्तानीच्या भूमिकेसाठी भन्साळी यांनी पसंत केले होते.पण, चित्रपटाची घोषणा होईपर्यंत सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झालं.त्यानंतर इच्छा नसतानाही भन्साळी यांना आपला निर्णय बदलावा लागला होता.

Web Title: bollywood actress isha koppikar reveals about she want to play kashibai role in bajirao mastani movie says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.