बॉलिवूड अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; २४ वर्षीय मुलीचं अचानक झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:14 PM2024-08-06T20:14:12+5:302024-08-06T20:17:41+5:30
बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलीनं तरुणवयात निधन झालं आहे. त्यामुळे तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई - बॉलिवूड जगतात एक दु:खद घटना समोर आली आहे. अभिनेत्री दिव्या सेठ शाह यांची मुलगी मिहिका शाह यांचं निधन झालं आहे. खूप कमी वयात मिहिकाने या जगाचा निरोप घेतल्यानं कुटुंबाला धक्का बसला आहे. मिहिकाच्या निधनाबाबत स्वत: तिच्या आईनं खुलासा केला आहे. मिहिकाचा अचानक मृत्यू झाल्याचं कळतंय. ती आजारी होती ५ ऑगस्टला तिचं निधन झालं.
दिव्या यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात मुलगी मिहिकासाठी शोकसभेचं आयोजन केले आहे. गुरुवारी ८ ऑगस्टला संध्याकाळी ४ ते ६ वाजता या शोकसभेचं आयोजन सिंध कॉलनीतील क्बल हाऊसमध्ये ठेवले आहे. दिव्या सेठच्या मुलीच्या निधनानं बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांनाही खूप धक्का बसला आहे. हे अचानक कसं झालं अशा प्रतिक्रिया या पोस्टवर येत आहेत. २९ जुलैला दिव्यानं मुलगी मिहिका आणि आई सुष्मा सेठसोबत एक फोटो शेअर केला होता. ज्यात या तिघीही आनंदात होत्या.
४ दिवसांपूर्वीच केलेल्या या पोस्टनंतर अचानक मिहिकाच्या निधनाच्या वृत्ताने नेमकं हे कसं झालं हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मिहिकाच्या निधनानं तिच्या घरचेही स्तब्ध झालेत. तिची आजी आणि अभिनेत्री सुष्मा सेठ यांना अश्रूही आवरता येत नाहीत. मिहिका वयाच्या २४ व्या वर्षी हे जग सोडून गेली त्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोण आहे दिव्या सेठ शाह?
दिव्या सेठ ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांची आई सुष्मा सेठ यादेखील अभिनेत्री राहिल्या आहेत. दोन्ही आई मुलीचे शाहरूख खानसोबत खूप चांगले संबंध होते. दिव्याला शाहरूख आपले अभिनयातील गुरु मानतो तर सुष्मा सेठ यांनी किंग खानच्या कभी खुशी कभी गम या सिनेमात काम केले आहे. शाहरुखने दिव्यासोबत त्याचा फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. त्यात लिहिलं होतं की, माझी खूप चांगली मैत्रिण दिव्या, जिनं मला अभिनय शिकवला असं म्हटलं होतं. दिव्या आणि शाहरुखची मैत्री त्यावेळी चर्चेत होती जेव्हा ते NSD मध्ये अभिनयाचं शिक्षण घेत होते.