"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:09 IST2025-07-08T16:08:53+5:302025-07-08T16:09:30+5:30
Aishwarya Rai : बॉबीने मुलाखतीदरम्यान आता एक किस्सा शेअर केला आहे. शूटिंग दरम्यान ती ऐश्वर्या रायकडे आकर्षित झाली. ऐश्वर्या खूप चांगली होती आणि तिची फिगर देखील कमाल होती असं म्हटलं आहे.

"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
अभिनेत्री बॉबी डार्लिंगने सुभाष घई यांच्या ताल चित्रपटात काम केलं आहे. रोल छोटा असला तरी सेटवर २५ दिवस शूटिंग केलं. बॉबीने एका मुलाखतीदरम्यान आता एक किस्सा शेअर केला आहे. तसेत शूटिंग दरम्यान ती ऐश्वर्या रायकडे आकर्षित झाली. ऐश्वर्या खूप चांगली होती आणि तिची फिगर देखील कमाल होती असं म्हटलं आहे. सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये बॉबी डार्लिंगने या चित्रपटात काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
"सुभाष घई यांनी मला तालमध्ये काम दिलं. ती एक छोटी भूमिका होती. मी २५ दिवस शूटिंग केलं पण रोल एडिट केला तर ते आमच्या हातात नाही. मला दररोज २५०० रुपये मिळायचे. सुभाष घईंनी ऑडिशन घेतलं आणि हिला ऐश्वर्याच्या डिझायनरची भूमिका द्या असं सांगितलं. जेव्हा मला ती भूमिका मिळाली. तेव्हा गाण्याचं शूटिंग सुरू होतं."
"मी ऐश्वर्याकडे आकर्षित झाले"
"जंगल में बोले कोयल... हे गाणं सुरू होतं. ऐश्वर्या राय उभी होती. सुभाषजी म्हणतात, बॉबी, तिच्या ब्लाउजचं हूक लाव. मी सुभाष घईंसमोर घाबरत घाबरत ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक लावलं. माझे हात थरथरत होते. मला वाटलं की, काय नशीब आहे. मला काम हवं होतं आणि भगवान शंकराने थेट मला ऐश्वर्या रायच्या शेजारी उभं केलं. ऐश्वर्या खूप विनम्र होती. ती खूप साधी होती. तिच्यासोबत काम करताना मी ऐश्वर्याकडे आकर्षित झाले. मला वाटलं की जर मी मुलगा असते तर मला अशी मुलगी हवी होती असं बॉबी डार्लिंगने म्हटलं आहे."
"माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
बॉबी डार्लिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. आईच्या मृत्यूबद्दल सांगत बॉबी डार्लिंग ढसाढसा रडली. "मला माफ कर आई, मी काय करू शकते? कोणीही समजू शकलं नाही. तूही समजू शकली नाहीस. तू मला सोडून वर गेलीस. मी इथेच राहिली. मी संपूर्ण जगाला तोंड देत आहे. मी एकटीच लढत आहे. मी काय करू? देवाने मला असं का बनवलं? ही माझी चूक नाही. मला खूप दुःख झालं आहे. मला वाटतं की, मी माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे" असं म्हटलं आहे.