‘बेफिक्रे’ माझ्यासाठी ‘रिस्क फॅक्टर’

By Admin | Updated: January 21, 2017 03:09 IST2017-01-21T03:09:43+5:302017-01-21T03:09:43+5:30

‘बेफिक्रे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री वाणी कपूर यांच्या अभिनयाचीच चर्चा सुरू झाली.

'Biskrere' for me 'Risk Factor' | ‘बेफिक्रे’ माझ्यासाठी ‘रिस्क फॅक्टर’

‘बेफिक्रे’ माझ्यासाठी ‘रिस्क फॅक्टर’


‘बेफिक्रे’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री वाणी कपूर यांच्या अभिनयाचीच चर्चा सुरू झाली. त्यांचा बिनधास्त आणि बेमालूम अंदाज चित्रपटाचा विशेष ठरला. तसेच वाणी कपूरचा बोल्ड अवतार हा चित्रपटाच्या गॉसिपिंगचा भाग ठरला होता. मात्र, बॉक्स आॅफिसवर चित्रपट फार काही कमाल दाखवू शकला नाही. खरंतर अभिनेत्री वाणी कपूर ही तिच्या ‘बेफिक्रे’ अंदाजाला ‘रिस्क फॅक्टर’ म्हणून संबोधते. ‘शिरा’ची भूमिका प्रेक्षकांना आवडली तर नाहीच उलट समीक्षक ांनीही तिच्या व्यक्तीरेखेचे दोषच दाखवले. ‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर. तिला दुसराच चित्रपट मिळाला तो देखील रणवीर सिंगसोबत. या चित्रपटाचे तिला ‘सोने’ करता आले असते. पण, अभिनयाच्या बाबतीत ती दुबळी ठरली आणि तिचा बोल्ड अंदाजही प्रेक्षकांना रूचला नाही. ती याविषयी म्हणते,‘ माझ्याकडे जेव्हा ‘बेफि क्रे’ ची आॅफर आली तेव्हा मला शीराची व्यक्तीरेखा जमेल की नाही असे वाटले होते. मात्र, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मला शीराचे कॅरेक्टर उत्तमप्रकारे जमेल असे ठासून सांगितले. म्हणून मग मी या भूमिकेचे आव्हान स्विकारले. माझा चेहरा नव्याने प्रेक्षकांसमोर अशा अंदाजात समोर येणार होता. तो माझ्यासाठी एक रिस्क फॅक्टरच होता.’

Web Title: 'Biskrere' for me 'Risk Factor'