सनी लिओनीच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 11:10 AM2018-05-14T11:10:46+5:302018-05-14T11:15:48+5:30

सनीने मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. पण बरीच वर्ष तिची ओळख एक पॉर्न स्टार म्हणूनच होती. आता हळूहळू तिची ती ओळख पुसली जात आहे. 

Birthday Special: Sunny Leone unknown facts on sunny birthday | सनी लिओनीच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

सनी लिओनीच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?

googlenewsNext

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने काल तिचा 38वा वाढदिवस साजरा केला. आज बॉलिवूडमध्ये येऊन तिला काही वर्ष झाली आहेत. पण इतक्या वर्षांनंतरही सनी बॉलिवूडमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. सनीने मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. पण बरीच वर्ष तिची ओळख एक पॉर्न स्टार म्हणूनच होती. आता हळूहळू तिची ती ओळख पुसली जात आहे. 

पॉर्न इंडस्ट्री सोडून सनी भारतातील बिग बॉस या शोमध्ये दाखल झाली. त्यानंतर ती कधीही तिच्या आधीच्या क्षेत्रात परत गेली नाही. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं. पण ती पॉर्न इंडस्ट्रीत का गेली याचा प्रश्न अनेकदा तिच्या चाहत्यांना पडतो. याचा खुलासा सनीने स्वत: एका मुलाखतीत केला होता. 

सनी लिओनीचा जन्म

सनी लिओनीचा जन्म कॅनडामध्ये एका पंजाबी परीवारात झाला. तिचे वडिल दिल्लीचे आणि आई हिमाचल प्रदेशातील आहे. नंतर दोघे कॅनडामध्ये स्थायिक झालेत. सनीचं शिक्षण एका कॅथलिक शाळेत झालं.  

मॉडेलिंगमध्ये पाऊल

सनी सुंदर होती त्यामुळे केवळ 10 व्या वर्षी तिच्या मनात सिने इंडस्ट्री आणि मॉडेलिंगचा विचार आला. परीवारातील कुणाचाही सिने इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. त्यामुळे सनीला चांगलाच स्ट्रगल करावा लागला. अनेक ठिकाणी तिने ऑडिशन दिल्या. दरम्यान ती एका बेकरीमध्येही कामही करत होती. 

अशात तिच्या एका मैत्रिणीने तिला एका मॉडेलिंग एजन्सीचा पत्ता दिला. सनी तिथे गेली. त्यावेळी तिला अजिबात माहीत नव्हतं की, ती एजन्सी अॅडल्ट इंडस्ट्रीसाठी काम करते. त्या एजन्सीमधील एका एजन्टने तिला अॅडल्ट इंडस्ट्रीत आणण्याचे ठरवले. त्याने तिला चांगली ऑफर दिली. सनी खूश होती.
सनीने त्या एजन्टला तिला काय काम करावे लागेल हे विचारले. त्यावेळी त्याने तिला एक मॅगझिन दाखवले. त्यानंतर त्या एजन्टने तिला एक ऑडिशन द्यायला सांगितले. या ऑडिशनमध्ये तिला वेबकॅमसमोर दोन मिनिटांसाठी टॉपलेस व्हायचं होतं. आता सनी या इंडस्ट्रीचा भाग झाली होती. तिने ठरवलं होतं की, तिला मागे वळून बघायचं नाहीये.

पहिला अॅडल्ट सिनेमा

सनीने दावा केला की, त्या कंपनीसाठी तिने एक अॅडल्ट सिनेमा केला होता. त्यात पॉर्न नव्हतं. पण त्यानंतर तिने पॉर्न सिनेमे साईन करणे सुरु केले होते. तिचा दुसरा सिनेमा पेंट हाऊस हा होता. त्यानंतर सनीने पॉर्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कंपनी विविड एन्टरटेन्मेट कंपनीसोबत करार केला. पुढील तीन वर्षात करनजीत कौर सनी लिओनी झाली होती.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री

2010 मध्ये सनी लिओनी टॉप 12 पॉर्न स्टारमध्ये होती. त्यावेळी तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली आणि ती बॉलिवूडमध्ये आली. सनीने जिस्म 2, रागिणी एमएमएस 2, जॅकपॉट, अशा सिनेमांमध्ये काम केलं. रईस सिनेमात तिने तिने शाहरुख खानसोबत एक आयटम डान्सही केला. अजून तिचे काही सिनेमे रिलीज होणार आहेत. सनीच्या सिनेमांचा एक वेगळा चाहता वर्ग असल्याने तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहेत.  

सनी लिओनीच्या काही खास गोष्टी

- सनीचं पदार्पण खरंतर २००५ साली आलेल्या कलियुग चित्रपटातून होणार होतं. मात्र तिने या चित्रपटासाठी १० लाख रूपये मागितले होते. ज्यामुळे चित्रपट दिग्दर्शकाने तिला नकार दिला होता.

- सनी प्रचंड वाचनप्रेमी आहे, तिला पार्टी करण्यापेक्षा पुस्तकं वाचणं आवडतं.

- सनीला वाचनासोबतच खाण्याची देखील प्रचंड आवड आहे. पाणीपुरी, दहीचाट हे तिचे विशेष आवडते पदार्थ आहेत.

- डेनियल वेबर सोबत लग्न होण्याआधी तिचा मॅट एरिक्सन याच्याशी साखरपुडा झाला होता.

- जगप्रसिध्द हास्यकलाकार रसेल पिटर सोबतही तिचे प्रेमसंबध होते.

- बेबी डॉल ही खूप घाबरट असून तिला किडे, मुंग्यांची खूप भिती वाटते.

- पॉर्न इंडस्ट्रीत येण्याआधी ती एका जर्मन बेकरीत काम करत होती.

- तिच्या कोणत्याही चित्रपटाचे स्क्रिप्ट हे पहिले तिचा नवरा डेनियल वेबर वाचतो. त्याने होकार दिल्यानंतरच सनी चित्रपट स्वीकारते.

Web Title: Birthday Special: Sunny Leone unknown facts on sunny birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.