Bigg Boss 19: तान्यावर एवढा कसला राग? क्रिकेटरची बहीण मालतीने थेट मित्तल मॅडमच्या कानाखालीच लगावली, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:33 IST2025-11-24T12:32:56+5:302025-11-24T12:33:36+5:30
बिग बॉसच्या टॉप ३ मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक सदस्य शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क सोमवारी पार पडणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.

Bigg Boss 19: तान्यावर एवढा कसला राग? क्रिकेटरची बहीण मालतीने थेट मित्तल मॅडमच्या कानाखालीच लगावली, काय घडलं?
Bigg Boss 19: बिग बॉस १९ हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. लवकरच बिग बॉस १९चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात कुनिका सदानंदने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आता घरात टॉप ८ सदस्य राहिले आहेत. बिग बॉसच्या टॉप ३ मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक सदस्य शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क सोमवारी पार पडणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये घरातील सदस्य त्यांना हव्या त्या व्यक्तीला नॉमिनेट करू शकतात. ज्या व्यक्तीला नॉमिनेट करायचं आहे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नॉमिनेटेड असा स्टॅम्प मारत नॉमिनेट करण्याचं कारण सांगायचं आहे. व्हिडीओत दिसतंय की प्रणित अमालला नॉमिनेट करतो. शहबाज तान्याच्या चेहऱ्यावर नॉमिनेटेडचा स्टॅम्प मारतो. अमाल गौरव खन्नाला नॉमिनेट करतो. त्यानंतर तान्या मालतीच्या चेहऱ्यावर स्टॅम्प मारत तिला नॉमिनेट करते. यावेळी तान्या मालतीच्या ओठांवर स्टॅम्प मारते. तान्याने स्टॅम्प मारताच मालती तिच्या कानाखाली मारत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हे पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाल्याचं दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले हा ७ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे आता ग्रँड फिनालेसाठी काहीच दिवस बाकी राहिले आहेत. सध्या घरात प्रणित मोरे, गौरव खन्ना, मालती चहर, तान्या मित्तल, फरहाना भट, शहबाज, अमाल मलिक आणि अश्नूर कौर हे सदस्य राहिले आहेत. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये सगळे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार हे पाहावं लागेल.