अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
By कोमल खांबे | Updated: November 3, 2025 11:00 IST2025-11-03T10:57:42+5:302025-11-03T11:00:49+5:30
प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला बिग बॉसच्या घराला निरोप घ्यावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रणितला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे सलमान खानलाही मोठा धक्का बसला आहे.

अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची एक्झिट झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. वीकेंड का वारमध्ये प्रणितने बिग बॉसमधून एक्झिट घेतली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला बिग बॉसच्या घराला निरोप घ्यावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रणितला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे सलमान खानलाही मोठा धक्का बसला आहे.
सलमानने वीकेंड का वारमध्ये प्रणितला त्याच्या तब्येतीसाठी बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागणार असल्याचं सांगितलं. सलमान म्हणाला, "प्रणित तुझे मेडिकल रिपोर्टस आले आहेत. दुर्देवाने तुझ्या तब्येतीसाठी आणि मेडिकल अटेंशनसाठी तुला बाहेर यावं लागेल. तू एलिमिनेट झालेला नाहीस. पण, तुझ्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे तुला या घरात मिळणार नाही. त्यामुळे तुला घराबाहेर यावं लागेल". प्रणितच्या एक्झिटने चाहत्यांसोबतच घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला. प्रणित परत घरात येणार का? असा प्रश्न घरातील सदस्यांनी विचारला. त्यावर सलमानने काहीच उत्तर न देता नकारार्थी मान हलवली.
बिग बॉसच्या घरातून प्रणित मोरे बाहेर तर पडला आहे. पण, इतर सदस्यांसारखी एक्झिट त्याने घेतलेली नाही. प्रणितने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर त्याच्या टीमकडून एक पोस्ट शेअर करत त्याच्याबद्दल हेल्थ अपडेट देण्यात आले आहेत. "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रणितची तब्येत आता ठीक आहे. बिग बॉसच्या टीमसोबत आमचा संपर्क आहे आणि प्रणितचे हेल्थ अपडेट्स ते देत आहेत. तुमचं प्रेम, पाठिंबा आणि त्याच्यासाठी करत असलेल्या प्रार्थना यासाठी आभारी आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत राहा. जय हिंद जय महाराष्ट्र", असं पोस्टमध्ये म्हटलं गेलेलं आहे.

प्रणितने एक्झिट घेतल्याने या आठवड्यात कोणतंही एलिमिनेशन झालेलं नाही. आता चाहत्यांना प्रणितला परत बिग बॉसच्या घरात पाहायचं आहे. मात्र ते शक्य होईल की नाही, हे येणाऱ्या काहीच दिवसांत कळेल. या आठवड्यातच प्रणित घराचा कॅप्टन झाला होता. आणि त्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत.