धर्मामुळे गर्लफ्रेंडने तोडलं नातं! डिप्रेशनमध्ये गेलेला 'हा' स्टार सिंगर; आता होतेय पुन्हा चर्चा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:19 IST2025-08-25T12:10:42+5:302025-08-25T12:19:52+5:30
मुस्लिम असल्याने गर्लफ्रेंडने लग्नासाठी दिलेला नकार, डिप्रेशनमध्ये गेला अन्...; आता होतेय पुन्हा चर्चा

धर्मामुळे गर्लफ्रेंडने तोडलं नातं! डिप्रेशनमध्ये गेलेला 'हा' स्टार सिंगर; आता होतेय पुन्हा चर्चा, कारण...
Amaal Malik: आपल्या सुमधुर गायनाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा लोकप्रिय गायक म्हणजे अमाल मलिक (Amaal Malik). 'आशिक सरेंडर हुआ','सूरज डूबा है','सोच ना सके','रोके ना रुकें नैना' यांसारखी लोकप्रिय गाणी त्याने गायली आहेत. गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या अमाल मलिक प्रचंड चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे तो 'बिग बॉस हिंदी'च्या १९ व्या पर्वात त्याने एन्ट्री घेतली आहे. 'घरवालों की सरकार' अशी यंदाच्या पर्वाची थीम आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा अमालकडे वळल्या आहेत.
दरम्यान, अमाल मलिकचे फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. अमाल त्याच्या गाण्यांसह स्पष्टोवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत येतो. परंतु, या गायकाचा प्रवास अगदीच सोपा नव्हता. त्याने या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्याच्या गायनापेक्षा लव्ह लाईफ प्रचंड चर्चेत राहिली. एका मुलाखतीत अमालने सांगितलं होतं की,"जवळपास पाच वर्ष प्रेयसीला डेट केल्यानंतर तिनं धर्माच्या कारणावरून ब्रेकअप केलं. आम्ही २०१४-२०१९ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होतो. पण, तिच्या घरच्यांना आमचं नातं मान्य नव्हतं. ते धर्म आणि माझ्या प्रोफेशनच्या विरुद्ध होते." असा खुलासा त्याने केला होता.
अमाल मलिक हा डब्बू मलिक यांचा मोठा मुलगा आहे. तर प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरमान मलिक त्याचा भाऊ आहे. त्याने सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली.शिवाय अमालने या चित्रपटातील तीन गाणी संगीतबद्ध केली होती. गायन क्षेत्र गाजवल्यानंतर अमाल आता बिग बॉसच्या घरात कसा टास्क खेळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.