"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:43 IST2025-09-23T10:43:03+5:302025-09-23T10:43:28+5:30

अमालचा भाऊ आणि प्रसिद्ध सिंगर असलेल्या अरमान मलिकने भावाच्या 'बिग बॉस' एन्ट्रीवर नाराजी व्यक्त करत त्याने तिथे जाण्याची गरज नव्हती, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा अरमानला 'बिग बॉस'बद्दल विचारताच तो भडकल्याचं दिसून आलं. 

bigg boss 19 armaan malik gets angry when aksed about amaal malik | "बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल

"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' सुरू होऊन एक महिना झाला आहे. यंदाच्या पर्वात अनेक बॉलिवूड चेहऱ्यांनी 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली. यापैकीच एक म्हणजे लोकप्रिय सिंगर अमाल मलिक. या बॉलिवूड सिंगरला 'बिग बॉस'च्या घरात पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. तर अमालचा भाऊ आणि प्रसिद्ध सिंगर असलेल्या अरमान मलिकने भावाच्या 'बिग बॉस' एन्ट्रीवर नाराजी व्यक्त करत त्याने तिथे जाण्याची गरज नव्हती, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा अरमानला 'बिग बॉस'बद्दल विचारताच तो भडकल्याचं दिसून आलं. 

अरमान मलिकला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. तेव्हा अरमानला 'बिग बॉस' आणि अमालबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अरमान म्हणाला, "माझा अमालला पूर्ण सपोर्ट आहे. तो जिंकून यावा अशी माझी इच्छा आहे". त्यानंतर त्याला अमालला काही मेसेज द्यायचा आहे का? असं विचारण्यात आलं. पण, तेव्हा मात्र अरमान भडकला. "तुम्ही मला माझ्याबद्दल विचारा. मला बिग बॉसबद्दल काहीच बोलायचं नाही. अमाल माझा भाऊ आहे आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने हा शो जिंकावा. पण तुम्ही मला सारखं बिग बॉसबद्दल विचारत आहात", असं अरमान म्हणाला. त्याचा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 


दरम्यान, अमाल मलिक 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. पहिल्या दिवसापासूनच त्याने घरात स्वत:चं स्थान बनवण्यास सुरूवात केली. टास्कमध्येही अमाल स्ट्रॅटेजी प्लॅन करताना दिसतो. आता तो 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत कुठपर्यंत टिकून राहतो हे पाहावं लागेल. 

Web Title: bigg boss 19 armaan malik gets angry when aksed about amaal malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.