पहिल्या पगारातून लेकीने भाऊ कदम यांना दिलं खास गिफ्ट! अभिनेता म्हणाला, "एवढा खर्च करुन.."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:03 AM2024-04-20T11:03:45+5:302024-04-20T11:04:25+5:30

भाऊ कदम यांच्या लेकीने बाबांसाठी पहिल्या पगारातून खास गिफ्ट खरेदी केलंय. हा खास व्हिडीओ बातमीवर क्लिक करुन बघा (bhau kadam)

bhau kadam daughter mrunmayee kadam buy special gift to her father video viral | पहिल्या पगारातून लेकीने भाऊ कदम यांना दिलं खास गिफ्ट! अभिनेता म्हणाला, "एवढा खर्च करुन.."

पहिल्या पगारातून लेकीने भाऊ कदम यांना दिलं खास गिफ्ट! अभिनेता म्हणाला, "एवढा खर्च करुन.."

अभिनेते भाऊ कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. गेली अनेक वर्ष कॉमेडीच्या माध्यमातून भाऊ कदम सर्वांना खळखळून हसवत आहेत. भाऊ यांच्या विनोदाचे असंख्य चाहते आहेत. निखळ, निरागस भाऊंना पाहताच तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं. भाऊंची लेक मृण्मयी कदम सुद्धा सोशल मीडियावर सक्रीय असते. अशातच भाऊंची लेक मृण्मयी वडिलांना स्वतःच्या कमाईतून एक खास गिफ्ट दिलंय ज्याची चांगलीच चर्चा आहे.

भाऊंची लेक मृण्मयीने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत बॅकग्राऊंडला तिचा गोड आवाज दिसतोय. मृण्मयीने तिच्या बाबांना तिच्या पहिल्या पगारातून शूज विकत घेतले आहेत. मृण्मयीने या व्हिडीओला कॅप्शन दिलंय की, माझ्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीला धन्यवाद. मी आज जिथे आहे ते फक्त तुमच्यामुळे. मला आशा आहे की तुम्हाला माझा अभिमान वाटत असेल. माझ्या पहिल्या पगारातून तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणं ही माझी लहानपणापासूनची इच्छा होती."

मृण्मयी पुढे लिहिते, "मी तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी थोडी बचत केली होती. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते देण्यासाठी तुमची मुलगी सक्षम झाली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला असंच नवनवीन गिफ्ट देणार आहे. तुम्ही गिफ्ट देण्याबद्दल मला कितीही ओरडाल तरीही मी तुम्हाला गिफ्ट देणारच आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही खुप चांगले वडील आहात." भाऊ कदम २२ एप्रिलपासून 'हसताय ना हसायलाच पाहिजे' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

Web Title: bhau kadam daughter mrunmayee kadam buy special gift to her father video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.