गरोदर महिलांसाठी फॅशनच्या जाहिरातीत बेबो ?

By Admin | Updated: August 17, 2016 01:57 IST2016-08-17T01:57:14+5:302016-08-17T01:57:14+5:30

बेगम आॅफ पतौडी करीना कपूर खान ही सध्या गरोदर असून पतौडी हाऊ समध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. करीना तिच्या बाळाला डिसेंबरमध्ये जन्म देणार आहे.

Bebo in fashion advertising for pregnant women? | गरोदर महिलांसाठी फॅशनच्या जाहिरातीत बेबो ?

गरोदर महिलांसाठी फॅशनच्या जाहिरातीत बेबो ?

बेगम आॅफ पतौडी करीना कपूर खान ही सध्या गरोदर असून पतौडी हाऊ समध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. करीना तिच्या बाळाला डिसेंबरमध्ये जन्म देणार आहे. ती सध्या ‘वीरें दी वेडिंग’ चित्रपटाचे शूटिंग करते आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंतच ती काम करू शकणार आहे. त्यामुळे तिला आणखी एक आॅफर आली आहे. गरोदर महिलांसाठीच्या आॅनलाइन पोर्टल फॅ शन ब्रँण्डसाठी ती जाहिरात करणार आहे. फॅशनच्या स्पेशल कलेक्शनसाठी तिने पुढाकार घेतला आहे. पोर्टलकडून तिला उत्तम ड्रेसिंग सेन्स आणि लूकसाठी निवडण्यात आले आहे.

Web Title: Bebo in fashion advertising for pregnant women?