मलाईकाने पुन्हा गोंदविला टॅटू
By Admin | Updated: September 1, 2014 06:03 IST2014-09-01T04:33:14+5:302014-09-01T06:03:12+5:30
गेल्या महिन्यात वयाची चाळिशी गाठलेल्या मलाईका अरोरा हिने स्विमिंग सूट परिधान केलेला आपला हॉट फोटो नुकताच सोशल साईटस्वर अपलोड केला होता

मलाईकाने पुन्हा गोंदविला टॅटू
गेल्या महिन्यात वयाची चाळिशी गाठलेल्या मलाईका अरोरा हिने स्विमिंग सूट परिधान केलेला आपला हॉट फोटो नुकताच सोशल साईटस्वर अपलोड केला होता. या फोटोत मलाईकाच्या उजव्या हातावर टॅटू गोंदविल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मलाईकाच्या चाहत्यांना तिचा टॅटू अत्यंत आवडला. मलाईकाने गोंदविलेला हा तिसरा टॅटू आहे. आकाशात उडत असलेल्या तीन चिमण्यांचा टॅटू मलाईकाने तयार केला आहे. ‘टॅटू नंबर तीन... स्वतंत्र झालेल्या चिमण्या किंवा चिमण्यांची झुंड’ असे तिने टिष्ट्वट केले आहे. विशेष म्हणजे टॅटू तयार करून घेतानाचा फोटोही तिने सोशल साईटस्वर टाकला आहे. आर्टिस्ट जहीर हा मलाईकावर टॅटू गोंदवत असल्याचे या छायाचित्रात दिसत आहे. ‘डॉली की डोली’ या आगामी चित्रपटात मलाईका एका आयटम साँगवर थिरकताना दिसून येणार आहे.