'बाजीराव-मस्तानी'ने गुपचुप उरकला साखरपुडा?

By Admin | Updated: July 7, 2016 08:04 IST2016-07-06T19:22:15+5:302016-07-07T08:04:19+5:30

बॉलिवूडचे लव्हबर्ड रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन यांनी गुपचुपपणे साखरपुडा उरकला आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणास रामलीला या चित्रपटानंतर सुरवात झाली

'Bajirao-Mastani' confused with Urqalka? | 'बाजीराव-मस्तानी'ने गुपचुप उरकला साखरपुडा?

'बाजीराव-मस्तानी'ने गुपचुप उरकला साखरपुडा?

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ : बॉलिवूडचे लव्हबर्ड रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन यांनी गुपचुपपणे साखरपुडा उरकला आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणास रामलीला या चित्रपटानंतर सुरवात झाली होती. अनेक पुरस्कार सोहळ्यात हे लव बर्ड एकत्र दिसले. रणवीरने तर अनेकदा दिपिकाचे कौतुक देखिल केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रणवीर आणि दीपिका यांनी गुपचुपपणे साखरपुडा केल्याची बातमी आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका आणि रणवीरचे आई-वडील एकमेकांना भेटले होते.

दोघांनीही नातेवाईकांच्या साक्षीने साखरपुडा केल्याची बातमी आहे. दोघांच्या कुटुंबियांनी रणवीर आणि दीपिकाचा साखरपुडा केला आहे. पण दीपिका आणि रणवीरचा लग्नाचा अजून काहीही विचार नाही आहे. त्यांना त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष द्यायचं आहे.
सध्या दीपिका हॉलिवूडमध्ये काम करतेय. लवकरच दीपिकाचा ट्रिपल एक्स सीरीज हा सिनेमा येणार आहे ज्यामध्ये ती विन डीजलसोबत लीड रोलमध्ये दिसणार आहे. तर रणवीरचा बेफ्रिके येणार आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने या हॉट जोडीने अजूनही त्यांच्यातील संबंधांचा सार्वजनिकपणे स्वीकार केलेला नाही. पण दोघांनी अनेकदा त्यांच्यातील असलेलं प्रेम हे जगासमोर अप्रत्यक्षपणे आणलं आहे.

Web Title: 'Bajirao-Mastani' confused with Urqalka?