पद्मश्री घेताना लक्ष्या असता तर काय म्हणाला असता? अशोक सराफ म्हणाले- "त्याला आनंद झाला असता आणि...."

By देवेंद्र जाधव | Updated: June 2, 2025 11:43 IST2025-06-02T11:40:52+5:302025-06-02T11:43:32+5:30

पद्मश्री अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण जागवून भावुक प्रतिक्रिया दिली आहे. अशोक सराफ लक्ष्याबद्दल काय म्हणाले?

Ashok Saraf talk about if laxmikant berde attend padmashri award ceremony | पद्मश्री घेताना लक्ष्या असता तर काय म्हणाला असता? अशोक सराफ म्हणाले- "त्याला आनंद झाला असता आणि...."

पद्मश्री घेताना लक्ष्या असता तर काय म्हणाला असता? अशोक सराफ म्हणाले- "त्याला आनंद झाला असता आणि...."

मराठीसह हिंदी सिनेसृष्टी आणि विविध भाषांमध्ये काम करणारे अभिनेते अशोक सराफ (ashok saraf) यांचा भारत सरकारकडून पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांना काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. अशोक सराफ यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यावेळी उपस्थित होत्या. या आनंदाच्या क्षणी अशोकमामांचा खास मित्र आणि सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात लक्ष्या असता, तर त्याला काय वाटलं असतं? याविषयी अशोक सराफ यांनी मनमोकळं उत्तर दिलं आहे.

पद्मश्री स्वीकारताना लक्ष्या असता तर...

मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांना विचारण्यात आलं की, पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्याच्या आनंदाच्या क्षणी लक्ष्मीकांत बेर्डे असते तर त्यांना काय वाटलं असतं? यावर अशोकमामा म्हणाले, "लक्ष्याला निश्चित आनंद झाला असता. कारण तो माझा अगदी जवळचा मित्र होता. आम्ही एकमेकांसोबत जवळपास ५० सिनेमे केले. त्यातले बरेचसे सिनेमे हिट आहेत. त्यामुळे त्याची माझी जोडी जमली होती. आमची मैत्री तर आधीपासूनच होती. त्यामुळे आता तो असता तर, त्याला निश्चित आवडलं असतं, आनंद झाला असता, याबद्दल वादच नाही."

टाईम मशीन असती आणि लक्ष्याला भेटायची वेळ आली असती तर काय सांगितलं असतं? असा प्रश्न विचारला असता अशोकमामा म्हणाले, "टाईम मशीन असती तर त्याला मी बोलावण्यापेक्षा तोच परत आला असता. लक्ष्या माझा ज्युनियर. 'मी गेलोय पुढे, हे झालंय इथपर्यंत. आता तू कर..', असं मी त्याला सांगितलं असतं." अशाप्रकारे अशोकमामांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण जागवून प्रतिक्रिया दिली.


अशोकामामांचा पद्मश्रीने सन्मान

२७ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अशोक सराफ यांचे चाहते आणि संपूर्ण महाराष्ट्राला यामुळे आनंद झाला असून सर्वांनी अशोकमामांचं अभिनंदन केलं
 

Web Title: Ashok Saraf talk about if laxmikant berde attend padmashri award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.