'धुरंधर'मधील टॉर्चर सीनवर अर्जुन रामपालने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "मला खूप बोरिंग वाटतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:14 IST2025-11-20T17:13:25+5:302025-11-20T17:14:06+5:30
अर्जुन रामपाल (Arjun Rampal) लवकरच 'धुरंधर' (Dhurandhar Movie) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यातील अर्जुन रामपालचा एक सीन खूप चर्चेत आला आहे.

'धुरंधर'मधील टॉर्चर सीनवर अर्जुन रामपालने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "मला खूप बोरिंग वाटतं..."
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट खूप चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन आणि सारा अर्जुन यांसारखी तगडी स्टारकास्ट दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्व कलाकारांच्या पात्रांची ओळख करून देण्यात आली. ट्रेलरमध्ये दाखवले आहे की, अर्जुन रामपाल एका भारतीय सैनिकाला टॉर्चर करताना दिसतो आहे. हा सीन खूप धोकादायक आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल मेजर इक्बालची भूमिका साकारत आहे.
अर्जुन रामपालने छळाच्या सीनवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. ट्रेलर लॉन्चवेळी जेव्हा त्याला विचारले गेले की, आदित्य धरने जेव्हा त्याला तो सीन सांगितला, तेव्हा त्याला कसे वाटले होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, "मला त्या सीनबद्दल जास्त बोलायचे नाहीये. कारण जेव्हा मी एखादा सीन, प्रोसेस आणि दिग्दर्शकाच्या विचारांबद्दल बोलतो, तेव्हा मला खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. पण मी हे नक्कीच म्हणेन की आजचा दिवस खूप खास आहे, कारण आदित्य धर यांनी इतका खास चित्रपट बनवला आहे."
'धुरंधर' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होणार असल्याच्याही बातम्या आहेत. या चित्रपटाची कथा थोडी मोठी होत असल्यामुळे, निर्माते हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज करण्याची योजना आखत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या भागाची घोषणा केली जाईल.
वर्कफ्रंट
अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याला शेवटचा 'निकिता रॉय' या चित्रपटात पाहिले गेले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. मात्र, आता या अभिनेत्याच्या हातात अनेक चित्रपट आहेत. 'धुरंधर' व्यतिरिक्त तो '3 मंकीज', 'पेंटहाऊस', 'ब्लाइंड गेम', 'नास्तिक' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.