ती माझ्या मूर्खपणावर हसते तेव्हा...; अर्जुन कपूरनं शेअर केला ‘लेडीलव्ह’ मलायकासोबतचा हटके फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 16:49 IST2021-11-07T16:48:48+5:302021-11-07T16:49:05+5:30
Arjun Kapoor-Malaika Arora : अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीतील मलायका व अर्जुनची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण आता याच पार्टीतला एक युनिक फोटो अर्जुनने शेअर केला आहे.

ती माझ्या मूर्खपणावर हसते तेव्हा...; अर्जुन कपूरनं शेअर केला ‘लेडीलव्ह’ मलायकासोबतचा हटके फोटो
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) दीर्घकाळापासून मलायका अरोरासोबत (Malaika Arora) रिलेशनशिपमध्ये आहे. सुरूवातीला दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला. पण मलायकाचा अरबाजसोबत घटस्फोट झाला आणि लपवण्याचं काहीही कारण उरलं नाही. यानंतर मलायका व अर्जुन अगदी बिनधास्त फिरताना दिसले. अलीकडे मलायका ‘कपूर’ कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत सामील झाली. अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीतील मलायका व अर्जुनची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण आता याच पार्टीतला एक युनिक फोटो अर्जुनने शेअर केला आहे.
या फोटोत मलायका पाठमोरी हसताना दिसतेय आणि तिच्या शेजारी अर्जुन मात्र खळखळून हसतोय. फोटो खास आहेच पण या फोटोसोबत अर्जुनने शेअर केलेलं कॅप्शन आणखीच खास आहे. ‘ती माझ्या मूर्खपणावर हसते तेव्हा ती मला आणखी आनंदी करते,’असं कॅप्शन अर्जुनने या फोटोला दिलं आहे. शिवाय हा इतका सुंदर, क्लासी फोटो काढल्याबद्दल अर्जुनने पापाराझींचे खास आभारही मानले आहेत. मलायकाने यावर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.
या फोटोवर चाहत्यांच्या आणि सेलिब्रिटींच्या कमेंट्सच्या पाऊस पडतोय. महीप कपूर, ईशा गुप्ता, ताहिरा कश्यप, भूमी पेडणेकर अशा अनेकांनी या फोटोला लाईक करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन कपूर अलीकडे ‘भूत पुलिस’ या सिनेमात दिसला होता. लवकरच तो जॉन अब्राहम, दिशा पाटनी, तारा सुतारिया स्टार ‘एक विलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कुत्ते आणि लेडी किलर हे दोन सिनेमेही त्याने साईन केले आहेत.