आर्ची पुन्हा होणार सैराट

By Admin | Updated: October 29, 2016 03:36 IST2016-10-29T03:36:04+5:302016-10-29T03:36:04+5:30

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तर या चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने प्रत्येकाला वेडं

Archie will be again Sairat | आर्ची पुन्हा होणार सैराट

आर्ची पुन्हा होणार सैराट

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तर या चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने प्रत्येकाला वेडं लावले आहे. सैराट हा चित्रपट कन्नड भाषेत येणार आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहीत होती. पण या कन्नड चित्रपटात आर्ची असणार आहे की नाही याविषयी निश्चित होत नव्हते. अखेर कन्नड भाषेतील सैराट चित्रपटात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूच असणार आहे हे आता निश्चित झाले आहे. नुकतेच कन्नड भाषेतील सैराट चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. या चित्रपटातील चित्रीकरणाचे काही सीन सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले आहे. तसेच या चित्रपटात आर्चीच्या भूमिकेसाठी १५० मुलींचे आॅडिशन घेण्यात आले. मात्र आर्चीच्या भूमिकेला टक्कर देणारी कोणी मिळाली नाही. त्यामुळे या चित्रपटात रिंकूची वर्णी लागली असल्याचे कळते. कन्नड भाषेतील सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. नारायण हे आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात रिंकूसोबत दाक्षिणात्य खलनायक सत्यप्रकाश यांचा मुलगा सी. बी. राजदेखील पाहायला मिळणार आहे.

Web Title: Archie will be again Sairat