अरबाज-सनीला खुणावतेय मॉरिशस...

By Admin | Updated: November 18, 2016 04:40 IST2016-11-18T04:40:37+5:302016-11-18T04:40:37+5:30

स नी आणि अरबाज खान हे दोघे प्रथमच राजीव वालिया यांच्या ‘तेरा इंतजार’ या म्युझिकल रोमँटिक चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

Arbaaz-Sunny Lexite Mauritius ... | अरबाज-सनीला खुणावतेय मॉरिशस...

अरबाज-सनीला खुणावतेय मॉरिशस...

स नी आणि अरबाज खान हे दोघे प्रथमच राजीव वालिया यांच्या ‘तेरा इंतजार’ या म्युझिकल रोमँटिक चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग मॉरिशस येथे सुरू होणार आहे. आता या चित्रपटासाठी इतकी हटके जोडी निवडण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या चित्रपटाचे काही फोटो अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोत अरबाज आणि सनी एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसताहेत. ‘सनडाऊन विथ द ब्युटीफुल सनी लिओनी,’ असे कॅप्शन या फोटोंना देण्यात आलेय. या फोटोतून सनी आणि अरबाजचा चित्रपटातील लूकही चाहत्यांना पाहायला मिळतोय. या दोघांनी ‘कच्छ’ येथे २५ दिवस चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीय. आता पुढील शूटिंग मॉरिशसला होणार आहे.

Web Title: Arbaaz-Sunny Lexite Mauritius ...