Kriti Sanon आणि प्रभासच्या अफेयरची चर्चा ऐकून अनुष्का शेट्टीचा झाला जळफळाट!, शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:36 PM2022-09-19T12:36:42+5:302022-09-19T12:37:42+5:30
Kriti Sanon And Prabhas: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन लव्हलाइफमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचं नाव बाहुबली फेम प्रभाससोबत जोडलं जात आहे.
![Anushka Shetty was shocked to hear the discussion of Kriti Sanon and Prabhas' affair!, shared the post | Kriti Sanon आणि प्रभासच्या अफेयरची चर्चा ऐकून अनुष्का शेट्टीचा झाला जळफळाट!, शेअर केली पोस्ट Anushka Shetty was shocked to hear the discussion of Kriti Sanon and Prabhas' affair!, shared the post | Kriti Sanon आणि प्रभासच्या अफेयरची चर्चा ऐकून अनुष्का शेट्टीचा झाला जळफळाट!, शेअर केली पोस्ट](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/prrbhas_202209884431.jpg)
Kriti Sanon आणि प्रभासच्या अफेयरची चर्चा ऐकून अनुष्का शेट्टीचा झाला जळफळाट!, शेअर केली पोस्ट
साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) 'बाहुबली' चित्रपटातील देवसेनेच्या भूमिकेतून खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि प्रभास(Prabhas)ची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या लिंकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन बाँडिंग इतकी जबरदस्त होती की त्यांना खऱ्या आयुष्यात एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता प्रभासचं नाव बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन(Kriti Sanon)सोबत जोडले गेलं आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान आता अनुष्का शेट्टीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप चर्चेत आली आहे.
प्रभास आणि क्रिती सनॉनच्या डेटिंगच्या अफवांमुळे अभिनेत्री अनुष्का शेट्टीनं इंस्टाग्रामवर कमबॅक केले आहे. खरे तर अनुष्का शेट्टी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असते. सुपरस्टार प्रभासचे काका कृष्णम राजू यांच्या निधनाच्या वेळी अनुष्का शेट्टीने तिची शेवटची पोस्ट शेअर केली होती. यापूर्वी अनुष्का शेट्टीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना स्वतःची झलक दाखवली होती. आता तिने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
प्रभास आणि क्रिती सनॉनच्या डेटिंगच्या बातम्यांदरम्यान अभिनेत्री अनुष्का शेट्टीने तिचा नवीन इन्स्टाग्राम डीपी पोस्ट केला आहे. अभिनेत्रीने तिचा नवीन इंस्टाग्राम डीपी म्हणून अरुंधती चित्रपटातील लूकमधील फोटोची निवड केली आहे. अभिनेत्रीचा नवीन डीपी बदलण्याच्या निर्णयाकडे प्रभास आणि क्रिती सनॉनच्या डेटिंगची चर्चा कारणीभूत असल्याचं नेटकरी मानत आहेत.
‘आदिपुरूष’ या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात सैफ अली खान हे कलाकारदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ ला रिलीज होतोय.