थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:15 IST2025-07-30T11:14:26+5:302025-07-30T11:15:58+5:30

Chakda Express Movie : अभिनेत्री अनुष्का शर्माने लेक वामिकाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी, कोविड दरम्यान तिचा पहिला ओटीटी चित्रपट 'चकदा एक्सप्रेस'ची घोषणा केली होती. त्यानंतर तिचे चाहते खूप खूश झाले होते. मात्र आता ७ वर्षांनंतरही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नाही.

Anushka Sharma's 'Chakda Express' goes on hiatus, Renuka Shahane said - "I was shocked.." | थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."

थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."

अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma)ने लेक वामिकाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी कोविड दरम्यान तिचा पहिला ओटीटी चित्रपट 'चकदा एक्सप्रेस'(Chakda Express Movie)ची घोषणा केली होती. त्यानंतर तिचे चाहते खूप खूश झाले होते. मात्र आता ७ वर्षांनंतरही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नाही. चाहत्यांना आशा होती की हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल, परंतु आता त्यांच्या इच्छाही धुळीस मिळाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' थंडबस्त्यात गेल्याच्या बातम्या येत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) देखील या चित्रपटात काम करत होती. तिने अलीकडेच चित्रपट रिलीज होणार नाही कळताच त्यावर प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री रेणुका शहाणेअनुष्का शर्माच्या 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारत होती. अलिकडेच, या चित्रपटाबद्दल एनडीटीव्हीशी खास बोलताना तिने म्हटले, "मला हे माहित नव्हते, हे जाणून मला खूप धक्का बसला आहे". अभिनेत्री पुढे म्हणाली की, "चकदा एक्सप्रेस हा एक सुंदर आणि प्रभावी चित्रपट आहे जो खूप मनापासून बनवला गेला आहे. हे कळल्यावर माझे मन दुखावले आहे. या चित्रपटासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. अनुष्का शर्मानेही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि माझे सीन्स खूप शक्तिशाली आणि प्रभावी होते."

"'चकदा एक्सप्रेस'मध्ये ती खिलाडूवृत्ती होती."

चित्रपटाबद्दल पुढे बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, "झुलन गोस्वामी हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे, ज्या गरीब कुटुंबातून असूनही त्यांनी मोठे यश मिळवले. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये अजूनही तफावत असतानाही त्यांनी एक छाप सोडली आहे, मी फक्त एवढेच सांगू इच्छिते की चकदा एक्सप्रेसमध्ये ती खिलाडूवृत्ती होती."

'चकदा एक्सप्रेस'बद्दल

'चकदा एक्सप्रेस'मध्ये अनुष्का शर्मा चित्रपटात माजी महिला क्रिकेट संघाची कर्णधार झुलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार होती. या भूमिकेत स्वतःला साकारण्यासाठी तिने झुलन गोस्वामीच्या देहबोलीपासून ते तिच्या क्रिकेट खेळण्याच्या शैलीपर्यंतच्या प्रत्येक पैलूला उत्तम प्रकारे टिपले होते. चित्रपट थंडबस्त्यात गेल्याच्या बातमीने केवळ रेणुकाचंच नाही तर चाहतेही नाराज झालेत.

Web Title: Anushka Sharma's 'Chakda Express' goes on hiatus, Renuka Shahane said - "I was shocked.."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.