फाईट सीन्स करताना सलमान खानपुढे अनेकांना फुटतो घाम, पण का? इंटरेस्टिंग आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:16 PM2021-10-26T17:16:45+5:302021-10-26T17:21:35+5:30

‘अंतिम’ चित्रपटातील सलमान व आयुषचा एक फायटींग सीन सध्या तुफान व्हायरल होतोय. सलमानसाठी ‘फायटिंग’ नवी नाही. पण आयुषसाठी ही ‘फायटिंग’ सोपी नव्हती.

Antim trailer Ayush Sharma Revealed Why Actors Scare From Salman Khan To Beat Him During Shooting | फाईट सीन्स करताना सलमान खानपुढे अनेकांना फुटतो घाम, पण का? इंटरेस्टिंग आहे कारण

फाईट सीन्स करताना सलमान खानपुढे अनेकांना फुटतो घाम, पण का? इंटरेस्टिंग आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्दे‘अंतिम’ सिनेमात सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत झळकेल.

सलमान खानचा  (Salman Khan) ‘अंतिम’ ( Antim) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ट्रेलर ( Antim Trailer) रिलीज झालाये. आयुष शर्मासोबतचा (Ayush Sharma ) सलमानचा हा सिनेमा येत्या 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय.  या सिनेमात सलमान पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे आणि त्याची टक्कर आयुष शर्मासोबत आहे. चित्रपटातील सलमान व आयुषचा एक फाईट सीन सध्या तुफान व्हायरल होतोय.  सलमानसाठी ‘फायटिंग’ नवी नाही. पण आयुषसाठी ही ‘फायटिंग’ सोपी नव्हती. होय, ‘अंतिम’च्या ट्रेलर लॉन्चप्रकरणी खुद्द आयुषने याबद्दलचा खुलासा केला. भाईजानसोबत फाईट सीन्स देताना मी प्रचंड घाबरलो होतो, असं आयुष म्हणाला.

त्याने सांगितलं, ‘भाईजान खूप गोड आहे. रिअल लाईफमध्ये तो अगदी लोण्याचा गोळा आहे. पण सिनेमाच्या सेटवर तो समोर उभा असतो तेव्हा भाईजान तुमच्या समोर आहे आणि त्याला तुम्हाला पंच मारायचा आहे, हा विचार करूनच पोटात गोळा येतो. मी तर इतका घाबरलो होतो की,मी माझ्या टीमला अगदी गाडी तयार ठेवायला सांगितली होती. पंच जरा का इकडे तिकडे झाला की मी गाडीत बसून सेटवरून पळून जाणार, असं मी त्यांना म्हणालो होतो.’
याआधी साऊथ सुपरस्टार किच्छा सुदीप यानेही ‘दबंग 3’वरचा असाच एक अनुभव शेअर केला होता. किच्छाला सलमानला लाथ मारायची होती. पण किच्छाचा धीर होईना. अखेर मी हे करूच शकणार नाही, मी सलमानला लाथ मारूच शकणार नाही, असं त्याने प्रभुदेवाला स्पष्ट सांगितलं होतं. तुमच्या मनात समोरच्याबद्दल सन्मान असतो, आदर असतो तेव्हा खोटं खोटं का असेना पण तुम्ही काही गोष्टी करू शकत नाही, असं किच्छा सुदीप म्हणाला होता. अनेक कलाकार याच एका कारणामुळे सलमानसोबत फाईट सीन द्यायला अनेकदा घाबरतात.

‘अंतिम’ सिनेमात सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत झळकेल. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून निर्मिती सलमान खाननेच केली आहे. या सिनेमात सलमान खानचा पुन्हा एकदा दबंग अंदाज पाहायला मिळणार आहे. राजवीर सिंह असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे.

Web Title: Antim trailer Ayush Sharma Revealed Why Actors Scare From Salman Khan To Beat Him During Shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.