अंकुश दिसणार ‘या’ भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 02:55 IST2017-07-10T02:55:33+5:302017-07-10T02:55:33+5:30

अंकुश चौधरीच्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाला मिळालेले यश पाहाता हे वर्षं त्याच्यासाठी खूप चांगले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

Ankush will appear in 'or' role | अंकुश दिसणार ‘या’ भूमिकेत

अंकुश दिसणार ‘या’ भूमिकेत

अंकुश चौधरीच्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाला मिळालेले यश पाहाता हे वर्षं त्याच्यासाठी खूप चांगले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या वर्षांत त्याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवा’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा अंकुश पाहायला मिळणार आहे. अंकुशच्या या लूकची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा या चित्रपटातील अंकुशचा लूक असणार आहे. या लूकप्रमाणेच या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील काहीशी हटके असणार आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव ‘देवा’ असून तो सगळ्यांचा लाडका दाखवला जाणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास काही महिने असल्याने त्याच्या फॅन्सना काही दिवस तरी त्याच्या नव्या चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Ankush will appear in 'or' role