नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:36 IST2025-05-22T12:36:01+5:302025-05-22T12:36:33+5:30
राखाडी रंगाच्या साडीत सुंदर दिसली अमृता

नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) २०१५ साली पंजाबी अभिनेता हिमांशु मल्होत्राशी (Himanshu Malhotra) लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत. मात्र अमृता आणि हिमांशु फार कमी वेळा एकत्र दिसतात. जेव्हा एकमेकांसोबत येतात तेव्हा लक्ष वेधून घेतात. हिमांशु मल्होत्रा आगामी 'केसरी वीर' सिनेमात दिसणार आहे. याच सिनेमाच्या स्क्रीनिंगला त्याच्यासोबत अमृताही हजर होती. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हिमांशु मल्होत्रा हिंदी, पंजाबी अभिनेता आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह' सिनेमात तो दिसला होता. तर आता तो सूरज पांचोलीसोबत 'केसरी वीर' मध्ये दिसणार आहे. काल मुंबईत सिनेमाचं स्क्रीनिंग पार पडलं. यावेळी हिमांशुसोबत त्याची 'बेटर हाफ' म्हणजेच मराठमोळी अमृता खानविलकरही पोहोचली. गोल्डन काठ असलेली राखाडी रंगाची साडीस त्यावर काळा-गोल्डन ब्लाऊज आणि हातात मॅचिंग पर्स अशा लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती. तिच्या कानातील मोठे झुमके, हातातील ब्रेसलेट लक्ष वेधून घेत होतं. तर हिमांशु मल्होत्रा काळ्या रंगाच्या सूट बूटमध्ये हँडसम दिसत होता. तसंच तो बायकोचा पदरही नीट करताना दिसला. या जोडीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. filmychhaya या पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
यासोबत अमृताने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत नवऱ्याच्या कामाची स्तुती केली आहे. ती लिहिते, "मी तुझ्यासाठी खूप खूश आहे चोटला...तू सिनेमात खूप छान काम केलं आहेस."
अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राची ओळख २००४ पासूनची आहे. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यांनी 'नच बलिए ७'चं विजेतेपदही पटकावलं होतं. अमृता मुंबईत राहते तर हिमांशु त्याच्या कामानिमित्त दिल्लीत असतो. त्यामुळे दोघंही फार कमी वेळा एकत्र दिसतात. तसंच दोघांनीही कायम आपलं वैवाहिक आयुष्य खाजगी ठेवल्याचं पाहायला मिळतं.