अमृताचे हॉट फोटोशूट

By Admin | Updated: July 13, 2016 01:28 IST2016-07-13T01:28:00+5:302016-07-13T01:28:00+5:30

आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अमृता खानविलकर आता तिच्या हॉट फोटोजमुळे चाहत्यांना मोहिनी घालणार आहे

Amrita's Hot Photoshoot | अमृताचे हॉट फोटोशूट

अमृताचे हॉट फोटोशूट

आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अमृता खानविलकर आता तिच्या हॉट फोटोजमुळे चाहत्यांना मोहिनी घालणार आहे. मराठी चित्रपट, हिंदी रिअ‍ॅलिटी शोज, अन २४ सारख्या कार्यक्रमांमुळे आज अमृताने तिचे प्रखर अस्तित्व इंडस्ट्रीमध्ये निर्माण केले आहे. नुकतेत तिचे एकदम ग्लॅमरस फोटोज सोशल साइट्सवर झळकत असून, यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. अमृताच्या या फोटोजना तिच्या चाहत्यांकडुन तर हिट्सवर हिट्स मिळत आहेत. शॉट्स आणि ब्लु कलरच्या लायनिंगच्या शर्टमधील तिचे हे फोटोज जाम भारी आले आहेत. तेजस नेरूरकर या फोटोग्राफरने अमृताच्या या हॉट अदा कॅमेरामध्ये कैद केल्या आहेत. आता तिचे हे फोटोशूट कोणत्या चित्रपटासाठी आहे की सहजच केलेय, हे तर आपल्याला काही दिवसांतच समजेल.

Web Title: Amrita's Hot Photoshoot