अमृता बनणार ‘सेलीब्रिटी गेस्ट’

By Admin | Updated: September 29, 2015 23:58 IST2015-09-29T23:58:17+5:302015-09-29T23:58:17+5:30

‘आता वाजले की बारा’ गाण्यातून घराघरात पोहोचलेली अमृता खानविलकर एक चांगली अभिनेत्री तर आहेच, पण ‘नच बलिये 7’च्या विजेतेपदावर नाव कोरून एक उत्तम नृत्यांगना

Amrita to become 'celebrity guest' | अमृता बनणार ‘सेलीब्रिटी गेस्ट’

अमृता बनणार ‘सेलीब्रिटी गेस्ट’

‘आता वाजले की बारा’ गाण्यातून घराघरात पोहोचलेली अमृता खानविलकर एक चांगली अभिनेत्री तर आहेच, पण ‘नच बलिये 7’च्या विजेतेपदावर नाव कोरून एक उत्तम नृत्यांगना असल्याचेही तिने सिद्ध केले आहे. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्वत:चे वेगळे स्थान मिळविण्यासाठी केवळ तिनेच नव्हे; तर तिचा नवरा हिमांशु मल्होत्रानेदेखील प्रचंड मेहनत घेतली. तिच्या याच यशामुळे आता ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती सेलिब्रिटी गेस्ट म्हणून एंट्री करणार आहे. तीन का तडका या कन्सेप्टच्या आधारे ती शोमधील स्पर्धक नेहा मर्दा आणि कोरिओग्राफर रंजित यांच्यासोबत परफॉर्म करणार आहे. ‘बेहेने दे’ या रावण चित्रपटातील गाण्यावर हे तिघे नृत्य सादर करणार असून, तीन नद्यांचा संगम या नृत्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘झलक मध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलावण्यात आले, त्याचा मला खूप आनंद होत आहे. आमचा परफॉर्मन्स चांगला व्हावा, म्हणून खूप मेहनत घेतली असल्याचे अमृता सांगते.

Web Title: Amrita to become 'celebrity guest'