अमरीश पुरींचे १० ' हॅट्स ऑफ' डायलॉग
By Admin | Updated: June 22, 2016 17:40 IST2016-06-22T17:20:27+5:302016-06-22T17:40:44+5:30
दमदार आवाज आणि तितकाच खणखणीत अभिनय अशी देणगी लाभलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस

अमरीश पुरींचे १० ' हॅट्स ऑफ' डायलॉग
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - दमदार आवाज आणि तितकाच खणखणीत अभिनय अशी देणगी लाभलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस. २२ जून १९३२ साली लाहोर, पंजाब (आता पाकिस्तान) येथे जन्मलेल्या अमरीश पुरी यांच्या अनेक भूमिका गाजल्या. हिरो बनण्यासाठी चित्रपटसृष्टीत आलेल्या अमरीश पुरी यांच्या खलनायक म्हणून भूमिका जास्त गाजल्या. मि.इंडिया, घायल, शहेनशहा याप्रमाणेच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, परदेस आदी चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. १२ जानेवारी २००५ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे काही गाजलेले डायलॉग खास तुमच्यासाठी :
मोगॅम्बो खुश हुआ - मिस्टर इंडिया
शेखर कपूर दिग्दर्शित हा चित्रपट त्याची अनोखी कल्पना, अनिल कपूर- श्रीदेवी यांच्या भूमिकेप्रमाणेच अमरीश पुरींच्या 'मोगॅम्बो' व्हिलनमुळेही खूप गाजला. त्यांच्या या भूमिकेने लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर एवढं गारूड केलं की सर्वांच्याच ओठी हा डायलॉग होता.
जा सिमरन जा - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अर्थात DDLJ
शाहरूख-काजोलची अनोखी केमिस्ट्री, युरोपचे सौंदर्य, सुमधुर गाणी यासोबतच DDLJ गाजला ते अमरीशजींच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ पित्याच्या भूमिकेमुळे.. या चित्रपटात ते खलनायक म्हणून नव्हे तर चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले.. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या दृश्यात आपल्या मुलीला तिच्या प्रियकरासोबत आनंदी जीवन जगण्यासाठी पाठवताना अमरीश पुरींचा ' जा सिमरन जा... जी ले अपनी जिंदगी' हा डायलॉग इतका गाजला आजही अनेक रोमँटिक सीन्समध्ये तो आवर्जून वापरला जातो.
जो जिंदगी मुझसे टकराती है, वो सिसक सिसक कर दम तोडती है - घायल
सनी देओलला ' अँग्री यंग मॅन' म्हणून ओळख मिळवून देणारा 'घायल' चित्रपट खूप गाजला. मात्र त्यामध्येही अमरीश पुरींनी खलनायक रंगवत सनीला पुरेपूर टक्कर दिली. या चित्रपटात अमरीश पुरी यांनी बलवंत राय या प्रसिद्ध उद्योगपतीची खलनायकी भूमिका केली होती.
यह दौलत भी क्या चीज़ है, जिसके पास जितनी भी आती है कम ही लगती है - दीवाना
दिव्या भारती, ऋषी कपूर, शाहरूख खान या कलाकारांची केमिस्ट्री, सुमधुर गाणी यामुळे गाजलेल्या 'दिवाना' चित्रपटात अमरीशी पुरींनी रंगवलेला खलनायक सर्वांच्या लक्षात आहे.
आदमी के पास दिमाग हो तो वह अपना दर्द भी बेच सकता है - ऐतराज
करीना कपू, प्रियांका चोप्रा व अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात अमरीश पुरी यांनी रजणीत रॉय या उद्योगपतीची, सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली. नव्या पिढीतील तीन मोठे कलाकार मुख्य भूमिकेत असतानाही अमरीश पुरी यांचा छोटासा रोलही खूप भाव खाऊ गेला.
मैं तो समझता था कि दुनिया में मुझसे बड़ा कमीना कोई नहीं है, लेकिन तुमने ऐन मौके पर ऐसा कमीनापन दिखाया कि हम तुम्हारे कमीनेपन के ही गुलाम हो गए : करण-अर्जून
शाहरूख व सलमान खान यांचा हा पहिलाच चित्रपट. त्यामध्ये अमरीश पुरी यांनी ठाकुर दुर्जन सिंह ही खलनायकी भूमिका साकारली होती.
तबादलों से इलाके बदलते हैं, इरादे नहीं… - गर्व
ब-याच चित्रपटात खलनायकाची भूमिका करमा-या अमरीशजींनी या चित्रपटात सलमानसोबत काम करताना पोलिस कमिशनर ‘समर सिंह’, अशी सकारात्मक भूमिका केली होती.
टिप बाद में देना तो एक रिवाज है, पहले देना अच्छी सर्विस की गारंटी है - शहेनशहा
अमिताभ बच्चन यांच्या दमदार भूमिकेमुळे गाजलेल्या या चित्रपटात अमरीश पुरी यांनी कुख्यात गुन्हेगार, जे.के.वर्मा, अशी खलनायकी भूमिका केली.
ये अदालत है कोई मंदिर या कोई दरगाह नहीं जहां, मन्नतें और मुरादें पूरी होते है. यहां धूप बत्ती और नारियल नहीं बल्कि ठोस सबूत और गवाह पेश किए जाते हैं. - दामिनी
मीनाक्षी शेषाद्री आणि सनी देओल यांच्या खणखणीत अभिनयाने गाजलेला चित्रपट म्हणजे 'दामिनी'.. मात्र या चित्रपटात एक वकीलाची भूमिका करताना अमरीश पुरींनी आपली चांगलीच छाप उमटवली. विरोधी पक्षाचे वकील (इंद्रजीत चड्ढा ) म्हणून उलटतपासणी दरम्यान अमरीश पुरी मीनाक्षी शेषाद्रीला प्रश्न विचारून भंडावून सोडतात, कोर्टातील त्याच एका प्रसंगादरम्यान त्यांचा हा डायलॉग खूप गाजला होता.
ऐसी मौत मारूंगा इस कमीने को कि भगवान यह पुर्नजन्म वाला सिस्टम ही खत्म कर देंगे : करण-अर्जुन
हा डायलॉगही करण-अर्जुनमधील असून त्यांच्या खलनायकासमोर शाहरूख-सलमानही काही काळ फिके पडले होते.