"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:13 IST2025-05-10T13:12:42+5:302025-05-10T13:13:14+5:30
एकीकडे भारत-पाक तणावाची परिस्थिती दुसरीकडे बिग बींना झालंय काय?

"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
एकीकडे भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. रोज तणावाचं वातावरण आहे. अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले होत आहेत. सेलिब्रिटीही यावर व्यक्त होत आहेत. भारतीय सैन्याला पाठिंबा देताना दिसत आहेत आणि त्यांचं मनोबल वाढवत आहेत. या सगळ्यात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं मात्र भलतंच काही सुरु आहे. ट्वीटरवर नेहमी सक्रिय असणारे बिग बी सध्याच्या परिस्थितीवर मात्र शांत आहेत. इतकंच नाही तर ट्विटरवर गेल्या काही दिवसांपासून ते नुसतेच अनुक्रमे कोड पोस्ट करत आहेत. यावरुन आता त्यांना नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी २२ एप्रिल रोजी ट्वीट केलं होतं. ज्यात म्हटलं होतं की The silent X chromosome deciding the brain. बिग बींच्या प्कत्येक ट्वीटला अनुक्रमांक असतो. मात्र २२ एप्रिलच्या पोस्टनंतर ते केवळ अनुक्रमांक ट्वीट करत आहेत. त्यापुढे काहीही लिहिताना दिसत नाहीयेत. इतकंच नाही रतन टाटा यांच्या निधनानंतरही त्यांनी काहीही ट्वीट केलं नव्हतं. सध्या भारत-पाकिस्तान देशांदरम्यानची स्थिती पाहता अमिताभ बच्चन यांनी मौन बाळगलं आहे. यावरुन नेटकरी त्यांना प्रश्न विचारत आहेत.
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अमिताभ बच्चन यांचे असे ट्वीट पाहून नेटकऱ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे तसंच त्यांना ट्रोलही केलं जात आहे. 'यांचं भलतंच युद्ध सुरु आहे','या कोडचा नेमका अर्थ काय आहे?','हा कसला कोडवर्ड आहे?','देशाच्या वीरांना पाठिंबा दिला पाहिजे तिथे यांनी मौन बाळगलं आहे'.