अमिताभ -अभिषेक ‘स्क्रीन शेअर’ करणार

By Admin | Updated: September 11, 2014 02:16 IST2014-09-11T02:16:16+5:302014-09-11T02:16:16+5:30

पा, सरकार आणि कभी अलविदा ना कहनासारख्या चित्रपटात दिसलेली अमिताभ-अभिषेक बच्चन ही वडील आणि मुलाची जोडी दिग्दर्शक मिलन लुथरियाच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकत्र दिसण्याची चिन्हे आहेत

Amitabh-Abhishek 'Screen Sharing' | अमिताभ -अभिषेक ‘स्क्रीन शेअर’ करणार

अमिताभ -अभिषेक ‘स्क्रीन शेअर’ करणार

पा, सरकार आणि कभी अलविदा ना कहनासारख्या चित्रपटात दिसलेली अमिताभ-अभिषेक बच्चन ही वडील आणि मुलाची जोडी दिग्दर्शक मिलन लुथरियाच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकत्र दिसण्याची चिन्हे आहेत. विद्या बालनसोबत ‘द डर्टी पिक्चर’ बनविणारा मिलन आता आपल्या नव्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. या चित्रपटात अमिताभ आणि अभिषेक यांना घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अमिताभ आणि अभिषेक यांना घेऊन चित्रपट बनविण्याची मिलनची बऱ्याच दिवसाची इच्छा होती. जर सर्व काही मनाप्रमाणे घडले, तर पुढील वर्षी शूटिंगला प्रारंभ होईल. बच्चन पिता-पुत्रांनी हा प्रस्ताव मान्य केल्यास मिलनच्या चित्रपटात अभिषेक प्रथमच झळकेल.

Web Title: Amitabh-Abhishek 'Screen Sharing'