राजामौलीच्या महाभारतात आमिर 'कृष्ण' व रजनीकांत 'भीष्म पितामह'?

By Admin | Updated: February 10, 2017 12:37 IST2017-02-10T12:26:54+5:302017-02-10T12:37:41+5:30

'बाहुबली' या सुपरहिट सिनेमाचे सुपरहिट दिग्दर्शक एस.एस. राजामौली लवकरच आपला दुसरा बिग बजेट प्रोजेक्ट 'महाभारत' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.

Amir 'Krishna' in Rajahmouli Mahabharata and Rajinikanth 'Bhishma Pitamah'? | राजामौलीच्या महाभारतात आमिर 'कृष्ण' व रजनीकांत 'भीष्म पितामह'?

राजामौलीच्या महाभारतात आमिर 'कृष्ण' व रजनीकांत 'भीष्म पितामह'?

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - 'बाहुबली' या सुपरहिट सिनेमाचे सुपरहिट दिग्दर्शक एस.एस. राजामौली लवकरच आपला दुसरा बिग बजेट प्रोजेक्ट 'महाभारत' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.  जेव्हापासून सिनेमाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून सर्वत्र महाभारताची जोरदार चर्चा सुरू आहे. आता तर सिनेमातील स्टार कास्टसंबंधित मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमामध्ये दोन सुपरस्टार एकत्र काम करणार आहेत. ते सुपरस्टार आहेत आमिर खान आणि रजनीकांत 
(‘या’ अभिनेत्रींनी साकारले ‘टेडी’सोबत आॅनस्क्रीन सीन्स!)
 
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि थलायवा रजनीकांत या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात रजनीकांत भीष्म पितामह आणि आमिर कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबतची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. पण, आमिर खान आणि रजनीकांत एकत्रित मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले तर नक्की सिनेरसिकांसाठी ही मेजवानीच असेल. 
(परवानगीशिवाय फोटो वापरणा-या ब्रँडची हृतिकने उडवली खिल्ली)
 
एप्रिलमध्ये 'बाहुबली 2' रिलीज झाल्यानंतर राजामौली त्यांचा अतिमहत्त्वकांक्षी प्रोजेक्ट महाभारताच्या तयारीला लागणार आहेत. राजामौली महाभारतासाठी खूपच उत्साहित असल्याचेही समजत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी सिनेमा तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषांमध्ये डब केला जाणार आहे. 
 

Web Title: Amir 'Krishna' in Rajahmouli Mahabharata and Rajinikanth 'Bhishma Pitamah'?