आलियाला ‘क्वीन’सारख्या हिटची अपेक्षा
By Admin | Updated: August 13, 2014 23:03 IST2014-08-13T23:03:16+5:302014-08-13T23:03:16+5:30
सध्या बॉलीवूडची मोस्ट डिमांडिंग हिरोईन असलेली आलिया भट्ट ‘क्वीन’ या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलसोबत काम करत असून त्याच्या ‘शानदार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार

आलियाला ‘क्वीन’सारख्या हिटची अपेक्षा
सध्या बॉलीवूडची मोस्ट डिमांडिंग हिरोईन असलेली आलिया भट्ट ‘क्वीन’ या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलसोबत काम करत असून त्याच्या ‘शानदार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘क्वीन’सारखा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या विकासकडून तिला तशाच चित्रपटाची अपेक्षा आहे. विकासची प्रशंसा करताना आलिया म्हणाली की, ‘विकास प्रतिभावंत दिग्दर्शक आहे. मी शाहिदसोबत विकास बहलच्या आगामी चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहे. विकाससोबत काम करण्याबाबत मी खूपच उत्सुक आहे. कामाच्या बाबतीत तो चांगला सहयोगी असून मला त्याचे काम खूप आवडते. चिल्लर पार्टी, ‘क्वीन’सारखे त्याचे चित्रपट माझ्या आवडीचे आहेत. आलिया विकास बहलच्या शानदार या चित्रपटात शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. यापूर्वी आलियाने शाहिदच्या अभिनयाची प्रशंसा केली होती.