'वास्तू'मध्ये ही शेवटची दिवाळी...; नवीन घरात शिफ्ट होण्याआधी आलिया भट भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:19 IST2025-10-20T17:18:39+5:302025-10-20T17:19:54+5:30
आलिया भट म्हणाली, "राहाचा याच घरात जन्म झाला, कदाचित तिला..."

'वास्तू'मध्ये ही शेवटची दिवाळी...; नवीन घरात शिफ्ट होण्याआधी आलिया भट भावुक
आलिया भट आणि रणबीर कपूर लवकरच त्यांच्या 'ड्रीम होम'मध्ये शिफ्ट होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून कृष्णाराज बंगल्याचं काम सुरु होतं जे आता पूर्ण झालं आहे. काही महिन्यात कपूर कुटुंब नवीन घरात जाणार आहेत. सध्या आलिया आणि रणबीर पाली हिल येथील 'वास्तू' अपार्टमेंटमध्ये राहतात. इथेच राहाचाही जन्म झाला. आता हे घर सोडताना आलिया भावुक झाली आहे. या घरात ही शेवटची दिवाळी असं तिने म्हटलं आहे.
ई टाइम्सशी बोलताना आलिया भट म्हणाली, "या घरात आमची ही शेवटची दिवाळी आहे. इथेच राहाचाही जन्म झाला. त्यामुळे खूप भावुक वाटत आहे. पण तितकीच उत्सुकताही आहे. या घरातले दिवस आणि इथली शेवटची दिवाळी राहाच्या कदाचित नंतर लक्षात राहणार नाही पण या घराने आम्हाला अनेक आठवणी दिल्या आहेत. त्यामुळे तिच्याही मनाच्या कोपऱ्यात नक्कीच या आठवणी राहतील. दिवाळी म्हणजे भावनांचा सण आहे ज्यामध्ये सगळीकडे प्रकाशमय वातावरण असते."
नवीन घराबद्दल आलिया म्हणाली, "कित्येक वर्षांपासून हे काम सुरु आहे आणि खरं सांगायचं तर आता खूप भारी वाटतंय. आयुष्यातल्या या टप्प्यासाठी मी खरंच स्वत:ला नशीबवान समजते. सध्या आम्ही शिफ्ट होण्याच्या गडबडीत आहोत पण आमचं मन भरलेलं आहे. आमचं मोठं स्वप्न पूर्ण होत आहे. ही भावना इतकी मोठी आहे की कदाचित आम्ही तिथे राहायला गेल्यानंतर किंवा कदाचित एखाद्या वर्षाने आम्हाला याची जास्त जाणीव होईल."
आलिया भट लवकरच संजय लीला भन्साळींच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशलही आहेत.