आँखे 2 चित्रपटाची 'झकास' स्टारकास्ट, अमिताभ आणि अनिल कपूर एकत्र

By Admin | Updated: August 18, 2016 11:00 IST2016-08-18T11:00:22+5:302016-08-18T11:00:22+5:30

आँखे चित्रपटाचा सिक्वेल येत असून अमिताभ बच्चन आणि अर्जून रामपालसहित अनिल कपूर, अर्शद वारसी आणि इलियाना डिक्रूझ अशी झकास स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे

Akshay's film 'Jhkaas' starred together, Amitabh and Anil Kapoor together | आँखे 2 चित्रपटाची 'झकास' स्टारकास्ट, अमिताभ आणि अनिल कपूर एकत्र

आँखे 2 चित्रपटाची 'झकास' स्टारकास्ट, अमिताभ आणि अनिल कपूर एकत्र

>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - आँखे चित्रपटाचा सिक्वेल येत असून नुकतीच चित्रपटाची स्टारकास्ट जाहीर करण्यात आली. 2002 मध्ये आलेल्या आँखे चित्रपटात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अर्जून रामपाल, परेश रावल आणि सुश्मिता सेन यांनी प्रमुख भुमिका निभावल्या होत्या. चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही दाद दिली होती. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा सिक्वेल येत असल्याने यावेळी चित्रपटात कोण असेल याची उत्सुकता होती. 
 
चित्रपटाची स्टारकास्ट जाहीर करण्यात आली असून अमिताभ बच्चन आणि अर्जून रामपाल दुस-या भागातदेखील असणार आहेत. अमिताभ यांच्यासोबतीला अनिल कपूर, अर्शद वारसी आणि इलियाना डिक्रूझ अशी झकास स्टारकास्ट असणार आहे. 
आँखेच्या पहिल्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विपुल शाह यांच्यावर होती. तर दुस-या भागाचं दिग्दर्शन अनीस बाजमी करणार आहेत. 'हा पहिल्या आँखेपेक्षा वेगळा आणि भव्य असेल', असं अनीस बाजमी यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Akshay's film 'Jhkaas' starred together, Amitabh and Anil Kapoor together