'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:27 IST2025-07-03T11:24:34+5:302025-07-03T11:27:15+5:30
अक्षया नाईकची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो...

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो...
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). 'ये रिश्ता क्या कहलाता हैं', 'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून अक्षया प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत अक्षयाने लतिका ही भूमिका साकारली आहे. आणि, पाहतापाहता ती तुफान लोकप्रिय झाली होती. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका संपल्यावर अक्षयाने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. मात्र, आता दोन वर्षांनी अभिनेत्री कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.
अक्षया नाईक 'सन मराठी' वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षयाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिनं मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "२ वर्षांनंतर परत एकदा येतेय तुमच्या भेटीला… सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेमध्ये मी एका नव्या भूमिकेत झळकणार आहे". या प्रोमोमध्ये अक्षया वकिलाच्या रुपात दिसून येतेय. अक्षयाची पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अक्षया ही सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. उत्तम अभिनयक्षमता असलेली अक्षया ही उद्योजिकादेखील आहे. अक्षया मुळची गोव्याची आहे. त्यामुळे तिनं मायभूमीमध्ये बहिणीच्या साथीने पर्यटकांसाठी होम स्टेची सोय केली आहे. पणजीपासून ८ किलोमीटर अंतरावर अक्षयाचं घर आहे. याच घराचं रुपांतर आता तिने होम स्टेमध्ये केलं आहे. या होम स्टेला अक्षयाने 'नाईक होम स्टे' असं नाव दिलं आहे. विशेष म्हणजे झिरो फिगर आणि सुडौल व्यक्तिमत्त्व ही हिरोईनची इमेज ब्रेक करणाऱ्या काही मोजक्या अभिनेंत्रीपैकी अक्षया ही एक आहे.