अक्षय - रजनीकांतचा मास्टर प्लॅन तयार

By Admin | Updated: January 29, 2017 02:43 IST2017-01-29T02:43:05+5:302017-01-29T02:43:05+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट दिवाळीत रिलीज केला जाणार आहे. मात्र, हा चित्रपट

Akshay - Rajinikanth's master plan is ready | अक्षय - रजनीकांतचा मास्टर प्लॅन तयार

अक्षय - रजनीकांतचा मास्टर प्लॅन तयार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट दिवाळीत रिलीज केला जाणार आहे. मात्र, हा चित्रपट आतापासूनच चर्चेत स्थान मिळवितो आहे. आतापर्यंत केवळ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे टीझर लाँचसाठी जोरदार तयारी चालविली असून यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
रजनीकांत व अक्षय कुमार यांच्या भूमिका असणारा ‘रोबोट २’ म्हणजेच ‘2.0’ या चित्रपटाचा टीझर १४ एप्रिलला रिलीज केला जाणार असल्याची माहिती मिळतेय. याच दरम्यान ‘बाहुबली २’ रिलीज केला जाणार आहे.
अशावेळी बाहुबली समोर ‘2.0’ मागे पडू नये असे निर्मात्यांना वाटू लागले आहे. यासाठीच या चित्रपटाच्या दोन आठवड्याआधी 2.0 चा टीझर लाँच केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2.0चा टीझर नेत्रदीपक सोहळा असणार आहे, विशेष म्हणजे हा टीझर तामीळ नववर्षावर रिलीज करण्यात येणार आहे. यासाठी चेन्नईमधील एक स्टेडिअम बुक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहीतरी भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे शूटिंग शिल्लक असून अक्षय कुमार आणि रजनीकांत ३० जानेवारीपासून शूटिंगला सुरुवात करतील असेही सांगण्यात येत आहे.

Web Title: Akshay - Rajinikanth's master plan is ready