पोलिसाच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसेल अजय

By Admin | Updated: January 18, 2017 02:58 IST2017-01-18T02:58:35+5:302017-01-18T02:58:35+5:30

अजय देवगनने आत्तापर्यंत आपल्या अनेक चित्रपटातून कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

Ajay will appear again in the role of policeman | पोलिसाच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसेल अजय

पोलिसाच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसेल अजय


अजय देवगनने आत्तापर्यंत आपल्या अनेक चित्रपटातून कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गंगाजल’ या चित्रपटातील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी अजयला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आता पुन्हा एकदा तो आणखी एका सत्यघटनेवर आधारित चित्रपटात कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. मध्यप्रदेशातील आयपीएस अधिकारी गौरव तिवारी यांनी केलेल्या एका घटनेच्या तपासावर निर्माता-दिग्दर्शक मधूर भांडारकर चित्रपटाची तयारी करीत असून यात अजय देवगन मुख्य भूमिका करणार असल्याचे कळतेय. या चित्रपटासाठी मधूरने अजय देवगनला पसंती दर्शविली आहे. मधूर भांडारकरच्या मते, अजयशिवाय ही भूमिका कुणी दुसरा अभिनेता निभावूच शकणार नाही. हा चित्रपटाची तयारी केली जात असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मात्र निर्मात्यांकडून याची अद्याप याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Web Title: Ajay will appear again in the role of policeman