'कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळा'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:05 PM2023-09-03T18:05:38+5:302023-09-03T18:07:40+5:30

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात.

'Ai Khe Kya Karte' fame actor Milind Gawli post | 'कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळा'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Milind Gawli

googlenewsNext

‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं.  मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहलं की, "असेल हरि तर देईल खाटल्यावरी "किंवा "नशिबात असेल तर मला मिळेल" असं म्हणून चालत नाही. तुम्हाला स्वतःला हात पाय हलवावेच लागतात, कष्ट करावे लागतात, जे काही ध्येय गाठायचं असेल, त्या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावं लागतं, आणि असं नाहीये की कोणाला नशिबाने मिळत नाही, किंवा हरी खटल्यावर देत नाही, पण जे काही कष्ट न करता मिळालेलं असतं ते फार काळ टिकतही नाही असा माझा अनुभव आहे, कष्ट करून मिळवण्याचा आनंद खूप वेगळाच असतो, आणि कष्ट करणे म्हणजे अगदी गदा मजदूरी करणे असे ही नाही, कष्ट करण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचे आहे". 

पुढे त्यांनी लिहलं की, "कष्ट करणे म्हणजे दिलेल्या वेळा पाळणे, यालाही खूप महत्त्व आहे, punctuality हा शब्दच बऱ्याचशा लोकांच्या dictionary मध्येच नसतो. आणि असं नाहीये की त्यांना यश मिळत नाही, मिळतं त्यांना पण यश मिळतं, खूप यश मिळतं, Punctual नसणारे आणि indiscipline कलाकार उदाहरणार्थ राजेश खन्ना, गोविंदा, शत्रुघन सिन्हा आणि disciplined, punctual कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन च नाव घेतलं जातं शशि कपूरचं नाव घेतलं जातं नंतरच्या पिढीतले आमिर खान, अक्षय कुमार यांचं नाव घेतलं. तुमचं जर तुमच्या कामावर प्रेम असेल तर तुम्हाला , तुमचं काम कष्टाच वाटत नाही".

पोस्टमध्ये त्यांनी अशोक सराफ यांच्याविषयी एक किस्सा सांगितला. त्यांनी लिहलं की, एकदा मला अशोक सराफ म्हणाले होते की ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर मला असं वाटेल "अरे यार आज शूटिंग आहे" शूटिंगचा मला कंटाळा येईल. त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन,आणि खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह आसतो , अगदी फिल्मचं किंवा सिरीयलचे शूटिंग असायला पाहिजे असं काही नाही. अगदी मग हे आजचं आशय बरोबरच फोटोशूट असलं तरी तो उत्साह काही कमी होत नाही.

पुढे ते म्हणतात, "तसाच उत्साह, तीच positive energy cameraman आशयमध्ये असते.सगळी अरेंजमेंट करणारा श्री मध्ये असते, दर्शना हजारे शानबाग ने तयार केलेले Costumes press iron करणारा संकेतमध्ये असते, मेकअप करणारा समीर म्हात्रे मध्ये, रुक्सार आणि राजू मध्ये असते, या सगळ्यांची collective, strong, positive energy, magic create करत असते. मग डोक्यावर कडक ऊन असलं तरी, घामाच्या धारा वाहत असल्या तरी, शूटिंग करत असताना मनावर थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करत असते असंच वाटतं !", असे मिलिंद गवळींनी पोस्टमध्ये म्हटले. मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. 

Web Title: 'Ai Khe Kya Karte' fame actor Milind Gawli post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.