नाना पाटेकर यांची पत्नी लॉग टाईमनंतर चित्रपटसृष्टीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 09:55 IST2016-05-24T04:25:03+5:302016-05-24T09:55:03+5:30

  मराठी चित्रपटसृष्टीची जान असणारे नाना पाटेकर यांची पत्नी नीलकांती पाटेकर या लॉग टाइमनंतर चित्रपटसृष्टीत झळकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या ...

After Nana Patekar's wife, the log-time filmmaker, | नाना पाटेकर यांची पत्नी लॉग टाईमनंतर चित्रपटसृष्टीत

नाना पाटेकर यांची पत्नी लॉग टाईमनंतर चित्रपटसृष्टीत

  
मराठी चित्रपटसृष्टीची जान असणारे नाना पाटेकर यांची पत्नी नीलकांती पाटेकर या लॉग टाइमनंतर चित्रपटसृष्टीत झळकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या निलीमा लोणारी दिग्दर्शित बर्नी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटच्या माध्यमातून त्या तब्बल २८ वर्षानंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. यापूर्वी त्यांनी सचिन पिळगावकर दिग्दर्शित आत्मविश्वास (१९८९) या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर काही मालिकांमध्ये देखील त्या झळकल्या होत्या. आता, नीलकांती पाटेकर यांच्या अभिनयाची जादू बर्नी या चित्रपटातून पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्या आईची भूमिका नीलकांती यांनी साकारली आहे. हा चित्रपट येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: After Nana Patekar's wife, the log-time filmmaker,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.