"बोल बच्चन"नंतर अभिषेकच्या "या" सिनेमातही आलं बच्चन नाव

By Admin | Updated: April 4, 2017 18:21 IST2017-04-04T18:13:22+5:302017-04-04T18:21:31+5:30

बच्चन हे आडनाव बॉलीवूडचं आवडीचं आहे असं वाटतं कारण चित्रपटांमध्ये याचा बिनदिक्कत वापर केला जात आहे.

After 'Bol Bachchan', Bachchan's name was also present in Abhishek's "This" movie | "बोल बच्चन"नंतर अभिषेकच्या "या" सिनेमातही आलं बच्चन नाव

"बोल बच्चन"नंतर अभिषेकच्या "या" सिनेमातही आलं बच्चन नाव

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बच्चन हे आडनाव बॉलिवूडचं आवडीचं आहे असं वाटतं कारण चित्रपटांमध्ये याचा बिनदिक्कत वापर केला जात आहे. 2012 मध्ये रोहित शेट्टीने आपल्या सिनेमाचं नाव बोल बच्चन ठेवलं होतं, त्यानंतर आता प्रियदर्शनही असंच काही करत आहे.
 
अभिषेक बच्चनने एक सिनेमा साईन केला असल्याचं वृत्त आहे. "बच्चन सिंग" असं या सिनेमाचं नाव आहे. सुनिल शेट्टी आणि रजत रवेल दोघं मिळवून हा सिनेमा बनवणार आहेत तर प्रियदर्शन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं वृत्त koimoi.com ने दिलं आहे. 
 
गेल्या काही दिवसांमध्ये अभिषेकने अनेक सिनेमे साईन केल्याचंही वृत्त आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी आपल्या आगामी सिनेमात अभिषेकला मुख्य भूमिका दिली आहे. तर थ्रिलर सिनेमे बनवण्यात हातखंडा असणा-या निशिकांत कामत यांनीही अभिषेकला आपल्या आगामी सिनेमात घेतलं आहे. निशिकांतने दृश्यम, रॉकी हॅंडसम आणि मदारी यांसारखे सिनेमे बनवले आहेत. 
 
याशिवाय प्रभू देवाच्या आगामी सिनेमातही अभिषेक काम करत आहे. लेप्टी असं या सिनेमाचं नाव आहे. अभिषेकचा मित्र बंटी वालिया या सिनेमाचा निर्माता आहे. बंटीसोबत अभिषेकने द्रोण सिनेमा बनवला होता, तो चांगलाच आपटला होता.    
 

Web Title: After 'Bol Bachchan', Bachchan's name was also present in Abhishek's "This" movie