नव्या वादात अडकलीनर्गीस

By Admin | Updated: August 30, 2014 04:27 IST2014-08-30T04:27:06+5:302014-08-30T04:27:06+5:30

बॉलीवूड अभिनेत्री नर्गीस फाखरी काही दिवसांपूर्वी ‘सेव्ह टायगर्स कॅम्पेन’मध्ये सहभागी झाली होती

Adkleenargis in the new controversy | नव्या वादात अडकलीनर्गीस

नव्या वादात अडकलीनर्गीस

बॉलीवूड अभिनेत्री नर्गीस फाखरी काही दिवसांपूर्वी ‘सेव्ह टायगर्स कॅम्पेन’मध्ये सहभागी झाली होती. या कॅम्पेननंतर कर्नाटकच्या ‘काबिनी वाईल्ड लाईप सेंच्युरी’ने नर्गीसला ‘गार्ड आॅफ आॅनर’ हा सन्मान प्रदान केला. आता मात्र या सन्मानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. पोलीस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नियम पुस्तिकेनुसार ‘गार्ड आॅफ आॅनर’ फक्त मंत्री, उच्चस्तरीय शासकीय अधिकारी किंवा इतर संविधानिक पदाधिकाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे नर्गीसला दिलेला हा सन्मान परत घेतला जाऊ शकेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरूच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे घडले याचा तपास सुरू आहे.

Web Title: Adkleenargis in the new controversy